महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / science-and-technology

Ashok Gadgil Get National Medal : आयआयटी मुंबईत शिक्षण घेतलेल्या वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांचा जो बायडेन यांच्याकडून सन्मान, वाचा सविस्तर - President Biden

Ashok Gadgil Get National Medal : भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांना अमेरिकेतील राष्ट्रीय पारितोषिकानं ( National Medal for Technology And Innovation ) सन्मानित करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात करण्यात आला.

Ashok Gadgil Get National Medal
अशोक गाडगीळ यांना पारितोषिक प्रदान करताना जो बायडन

By PTI

Published : Oct 25, 2023, 8:37 AM IST

वॉशिंग्टन Ashok Gadgil Get National Medal :भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांना अमेरिकेत प्रतिष्ठेचं असलेलं राष्ट्रीय पारितोषिक ( National Medal for Technology And Innovation ) प्रदान करण्यात आलं आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्ते तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण शोधांसाठी हे पारितोषिक वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांना प्रदान करण्यात आलं आहे. अमेरिकन नागरिकांच्या स्पर्धात्मक जीवनात शाश्वत योगदान दिल्यामुळे वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आलं. अमेरिकन तंत्रज्ञानाला बळकट करण्यासाठी संशोधन केल्यानं वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांनी अमेरिकेत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांनी लावले वेगवेगळे शोध :अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मंगळवारी तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांना पारितोषिक प्रदान केले. यात त्यांनी 12 वैज्ञानिकांपैकी अशोक गाडगीळ यांनाही सन्मानित केलं. अशोक गाडगीळ यांनी पिण्याच्या पाण्याचं तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, विद्युत रोषणाई, यासह विकसनशील जगातील गुंतागुंतीच्या अनेक विषयावर संशोधन केलं आहे.

अशोक गाडगीळ स्थापत्य, पर्यावरण अभियांत्रिकेचे प्रतिष्ठीत प्राध्यापक :भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक अशोक गाडगीळ हे बर्कले इथल्या स्थापत्य आणि पर्यावरण अभियांत्रिकेचे प्रतिष्ठीत प्राध्यापक आहेत. अशोक गाडगीळ यांचं आतापर्यंतचं हे 17 पदक आहे. तर बर्कले लॅबच्या संशोधकांनी मिळवलेलं हे दुसरं राष्ट्रीय पदक आहे. अशोक गाडगीळ यांनी मुंबई विद्यापीठ ( तेव्हाचं बॉम्बे विद्यापीठ ) आणि कानपूर आयआयटी इथून भौतिकशास्त्राची पदवी मिळवली आहे. अशोक गाडगीळ यांनी 1980 मध्ये लॉरेन्स बर्कले नॅशनल लॅबोरेटरी (बर्कले लॅब) मध्ये आपल्या सेवेला सुरुवात केली होती. तर या वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांनी सेवानिवृत्ती घेतली आहे. आता अशोक गाडगीळ हे सेवानिवृत्तीनंतर संलग्न म्हणून बर्कले लॅबसोबत कार्यरत आहेत.

व्हाईट हाऊसनं केला सन्मान :भारतीय वंशाचे अमेरिकन वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांनी अमेरिकत अनेक वैविध्यपूर्ण संशोधन केलं आहे. याबाबत अमेरिकन व्हाईट हाऊसनं त्यांचा सन्मान केला आहे. जगभरातील नागरिकांना संसाधनं प्रदान करण्यासाठी वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांनी अनेक शोध लावले आहेत. पिण्याच्या पाण्यासापासून ते स्वस्त इंधनापर्यंत वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांनी मोठ्या आव्हानांचं निराकरण केल्याचं व्हाईट हाऊसनं यावेळी स्पष्ट केलं आहे. समाजातील शेवटच्या घटकांना आपल्या संशोधनाचा उपयोग व्हावा, म्हणून मी माझ्या विज्ञान आणि अभियांत्रिकी सर्जनशिल संशोधन करत असल्याचं वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांनी बर्कले लॅबला दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा :

  1. ISRO Job : इस्रोमध्ये करिअर करायचयं ? जाणून घ्या सविस्तर
  2. Science Study: राज्यातील शाळांमध्ये शनिवारी विज्ञानवारी; ग्रामीण भागातील शाळांमध्ये होणार विज्ञानाचा प्रसार

ABOUT THE AUTHOR

...view details