हैदराबाद : जवळपास अर्धा कोटी देशांतर्गत आणि जवळपास तीन कोटी जगभरात कोविड केसेसचा अनियंत्रित प्रसार महामारीच्या तीव्र प्रसाराचे संकेत देत आहे. योग्य लसीसाठी विविध देशांमध्ये सुरू असलेल्या १४०हून अधिक प्रयोगांच्या यशाची प्रतीक्षा मानवजात उत्सुकतेने करीत आहे. ऑक्सफर्डमधील लस शोधण्याच्या प्रयोगाने दोन टप्पे यशस्वीपणे पार पाडले असले तरीही आता प्रयोगाच्या अत्यंत महत्वाच्या तिसऱ्या टप्प्यात असताना, अपेक्षित अडथळ्याला सामोरे गेला आहे. इंग्लंडची सर्वात विशाल औषधे बनवणारी कंपनी अस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने तिसऱ्या टप्प्यातील प्रयोग यासाठी स्थगित केले आहेत, कारण लस टोचलेल्या स्वयंसेवकामध्ये स्नायुविज्ञानविषयक गुंतागुंत निर्माण झाली. स्वायत्त सुरक्षा आणि फेरआढावा समितीने तातडीचे निरिक्षण केल्यानंतर त्यांनी आता प्रयोग पुन्हा सुरू केला आहे. लसीचे यश हे संशोधनाच्या यशावर अवलंबून आहे, जे संशोधन व्यापक स्तरावर विविध टप्प्यांमध्ये करण्यात आले असून संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर लस यशस्वी झाली पाहिजे.
गेली अनेक वर्षे, अनेक वैज्ञानिक इशारा देत आहेत की, अनेक गुंतागुंती निर्माण होत असल्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी परिणामकारक लसीची रचना तयार करणे सोपे नाही. व्हाईट हाऊसचे अध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर आपल्या देशाच्या लस उत्पादन करणाऱ्या प्रयोगशाळांची हॅकिंग करत असल्याचा केलेला आरोप, संपूर्ण मंजुरी येईपर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण केले जाऊ शकते, ही बीजिंगने घाईघाईत केलेली घोषणा आणि तिसऱ्या टप्प्याचा उल्लेखही न करता रशियाने चालवलेली सामूहिक लसीकरणाची तयारी... हे सर्व जीव वाचवणारे औषध विकसित करण्याबाबत अनेक शंका निर्माण करत आहेत. वैज्ञानिक असे म्हणतात की, परीक्षेचा तिसरा टप्पा यशस्वीपणे पार पाडल्यावर लस सार्वजनिक उपयोगासाठी आणण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १२ ते १८ महिने लागू शकतील. अस्ट्रोजेनने, या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षीच्या सुरुवातीला, लस उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचे जे अलिकडेच आश्वासन दिले आहे, ते धोकादायक घाईकडे अंगुलीनिर्देश करत आहे.