नवी दिल्ली India Arab Ties : गेल्या आठवड्यात हमासच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा आणि प्रकटीकरणाचा निषेध करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रझान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितलं. सौदी अरेबियानं पॅलेस्टिनी लोकांना त्यांचं कायदेशीर हक्क नाकारलाय. तसंच संयम बाळगण्याचंही आवाहन केलंय. पश्चिम आशियाच्या या सध्याच्या संघर्षाचा नवी दिल्ली आणि अरब जगतामधील संबंधांवर काही परिणाम होईल की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
मंगळवारी एका दूरध्वनी कॉल दरम्यान पंतप्रधान नेतान्याहू यांनी शनिवारी गाझा इथून हमासनं केलेल्या धक्कादायक हल्ल्यानंतर इस्रायलच्या परिस्थितीबद्दल मोदींना माहिती दिली. हल्ल्यात इस्त्रायल आणि हमासकडी दोन्ही बाजूंचे सुमारे 1,600 हून अधिक लोक मारले गेले. या संभाषणानंतर मोदींनी एक्सवर पोस्ट करत ' फोन कॉलवर सद्य परिस्थितीबद्दल अपडेट्स दिल्याबद्दल मी पंतप्रधान @netanyahu यांचे आभार मानतो,' असं मोदींनी पोस्टमध्ये म्हटलं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढं लिहिलं की, 'या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. भारत दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो. दरम्यान, पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असं म्हणत भारताचा मित्रपक्ष सौदी अरेबियानं दोन्ही बाजूंमधील वाढता संघर्ष त्वरित थांबविण्याचं आवाहन केलंय.
सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलंय की, 'राज्यानं दोन्ही बाजूंमधील तणाव त्वरित थांबवावा, नागरिकांचं संरक्षण करावं आणि संयम ठेवावा असं आवाहन केलंय. पॅलेस्टिनी लोकांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवल्यामुळं आणि त्याच्या पवित्रतेविरुद्ध पद्धतशीर चिथावणीची पुनरावृत्ती झाल्यामुळं परिस्थितीच्या धोक्यांबद्दल सौदीनं वारंवार इशारा दिला होता.' निवेदनात पुढं म्हटलंय की, ' आंतरराष्ट्रीय समुदायाला आपली जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि विश्वासार्ह शांतता प्रक्रिया सक्रिय करण्याच्या आवाहन आहे. ज्यामुळं प्रदेशात सुरक्षा आणि शांतता प्राप्त करण्यासाठी आणि नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी दोन-देशांचे समाधान होऊ शकते. तर, यावरून भारत आणि सौदी अरेबियाचे संघर्षावर वेगवेगळे विचार असल्याचं दिसून येतं का? असा प्रश्न उपस्थित होतो.