नवी दिल्ली- वनप्लस कंपनी ही स्मार्टफोनमधील अनोख्या संकल्पनेवर काम करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नव्या संकल्पनेत श्वासाप्रमाणे वनप्लस ८ टीमध्ये रंग बदलतो.
वन प्लसच्या नव्या मॉडेलच्या काचेत मेटल ऑक्साईडचा वापर केला आहे. त्यामुळे स्क्रीनचा रंग बदलणे शक्य होते. मेटल ऑक्साईड सक्रिय झाल्यानंतर स्क्रीनचा रंग गडद निळा व अथवा चंदेरी होतो. यामधील रडार तंत्रामुळे तुमचा श्वास ओळखता येतो. त्याप्रमाणे स्क्रीनचा रंग बदलतो. त्यामुळे हे मॉडेल परिणामकारक बायोफीडबॅक डिव्हाईस झाले आहे.