महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

खरेदी करा सॅमसग गॅलक्सी एस सीरिज केवळ ९,०९९ रुपयांमध्ये, जाणून घ्या...

सॅमसगने 'गॅलक्सी एस सीरिज'चे ३ नवे स्मार्टफोन  गॅलक्सी एस10, गॅलक्सी एस10 प्लस आणि गॅलक्सी  एस10 ई लाँच केले आहेत. सॅमसंग गॅलक्सी S10, S10 Plus, S10e ची प्री-बुकिंग सुरू झालेली आहे. हे फोन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, एअरटेलच्या ऑनलाईन स्टोर, सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोर आणि रिटेल स्टोरवरुन प्री-बुक करता येऊ शकतात. भारतात या फोनची विक्री ८ मार्चपासून सुरू होणार आहे.

By

Published : Feb 24, 2019, 3:24 PM IST

galaxy

टेक डेस्क - सॅमसगने 'गॅलक्सी एस सीरिज'चे ३ नवे स्मार्टफोन गॅलक्सी एस10, गॅलक्सी एस10 प्लस आणि गॅलक्सी एस10 ई लाँच केले आहेत. सॅमसंग गॅलक्सी S10, S10 Plus, S10e ची प्री-बुकिंग सुरू झालेली आहे. हे फोन अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, एअरटेलच्या ऑनलाईन स्टोर, सॅमसंगच्या ऑनलाईन स्टोर आणि रिटेल स्टोरवरुन प्री-बुक करता येऊ शकतात. भारतात या फोनची विक्री ८ मार्चपासून सुरू होणार आहे.

एअरटेलने यी तिन्ही फोनसाठी डाउनपेमेंटची ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये हा फोन केवळ ९,००९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. या ऑफरमध्ये जर तुम्हाला गॅलक्सी एस सीरिजचे फोन घ्यायचे आहेत तर एअरटेलच्या ऑनलाईन स्टोरवरुन Galaxy S series EMI वर घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह १०० GB डेटा मिळणार. यासह अॅमेझॉन प्राईमचे १ वर्ष आणि नेटफ्लिक्सचे ३ महिन्यांसाठी सब्स्क्रिप्शन मिळणार.

Samsung Galaxy S10 साठी डाउनपेमेंट केल्यानंतर तुम्हाला 2,999 रुपयांचे २४ EMI भरावे लागतील. जर तुम्हाला गॅलक्सी एसप्लस घ्यायचा आहे तर 15,799 रुपये डाउनपेमेंट करावे लागेल. Galaxy S10e साठी तुम्हाला 7,499 रुपयांचे डाउनपेमेंट करावे लागेल. Samsung Galaxy S10 ची भारतात किमान किंमत 66,900 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट मॉडेल मिळणार. तर 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किमान किंमत 84,900 रुपये आहे.

गॅलक्सी एस10 प्लसची किमान किंमत 73,900 रुपये तर गॅलक्सी एस10 ईची कमाल किंमत 55,900 रुपये आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना केवळ 9,999 रुपयांमध्ये गॅलक्सी वॉच मिळणार आणि यासह २,९९९ रुपयांमध्ये गॅलक्सी बड्स मिळणार. Samsung Galaxy S10 सीरिजमध्ये डुअल सीम सपोर्टसह अँड्रॉईड पाय ९.० आहे. भारतातही या फोन्सची चांगली क्रेझ निर्माण झाली आहे. सॅमसंगच्या प्रॉडक्ट्सी आवड असणारे या फोन्सची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details