मुंबई- अचानक जिओचा डाटा संपल्यानंतर रिचार्ज कसे करायचे असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? यावर आता नक्कीच उत्तर आहे. भारतामधील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने ग्राहकांकरिता इमर्जन्सी डाटा (emergency data loan) लोनची सुविधा जाहीर केली आहे. या सुविधेमुळे जिओच्या ग्राहकांना त्वरित डाटा पूर्ववत सुरू ठेवता येणार आहे.
इमर्जन्सी डाटा लोन म्हणजे काय?
इमर्जन्सी डाटा लोनच्या सुविधेमुळे ग्राहकांना आता रिचार्ज मिळवा आणि नंतर पैसे भरा असा पर्याय मिळतो. जिओचा डाटा संपल्यानंतर त्वरित रिचार्ज करणे शक्य होत नाही. अशावेळी ग्राहक रिचार्ज करून नंतर पैसे भरू शकतात. जिओ ग्राहकांना १ जीबी आणि ११ रुपयांचे ५ इमर्जन्सी प्लॅन उपलब्ध करून देणार आहे.
हेही वाचा-'तालिबानी' शिक्षा! वडील आणि भावाकडून तरुणीला काठीने बेदम मारहाण
असा मिळवा इमर्जन्सी डाटा प्लॅन
1. मायजिओ अॅप सुरू करा. त्यामध्ये डावीकडे टॉपवर मेन्यू निवडा.