टेक डेस्क - आधार कार्ड किती महत्त्वाचे आहे हे आता वेगळ्याने सांगायची गरज नाही. मात्र चुकून जर आधार कार्ड हरवले तर मात्र मोठी समस्या निर्माण होते. अशात जर मोबाईल नंबरही रजिस्टर्ड नसेल तर आणखीन मोठा प्रश्न निर्माण होतो.
आधार कार्ड हरवलेय, नंबरही रजिस्टर्ड नाही, 'या' टीप्स करा फॉलो - online registration
आधार कार्ड किती महत्त्वाचे आहे हे आता वेगळ्याने सांगायची गरज नाही. मात्र चुकून जर आधार कार्ड हरवले तर मात्र मोठी समस्या निर्माण होते. अशात जर मोबाईल नंबरही रजिस्टर्ड नसेल तर आणखीन मोठा प्रश्न निर्माण होतो.
मात्र अशावेळेस घाबरुन जायची गरज नाही. तुम्ही फोन किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरच्या माध्यमातून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणची (यूआयडीआय) वेबसाईट https://uidai.gov.in/hi/ वर भेट द्या. त्यानंतर आधारची वेबसाईट हिंदी भाषेत ओपन होणार. जर तुम्हाला इंग्रजीत एक्सेस करायची असेल तर https://uidai.gov.in वर जा. त्यानंतर डाव्या बाजूला आधार प्राप्त करण्यासाठी बनवलेल्या सेक्शनमध्ये आधारचे पुनर्मुद्रणाचे (Pilot basis) विकल्प मिळणार. त्यावर क्लिक करा आणि आपला आधार नंबर आणि सिक्युरिटी कोड टाका आणि Request OTP बॉक्सवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही वापरत असलेला मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईल नंबरवर व्हेरिफिकेशनसाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) येणार. ओटीपी टाकल्यानंतर पुढे जा.
तुम्हाला नंतर ५० रुपये ऑनलाईन भरावे लागतील. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा युपीआय पेमेंटच्या मदतीने तुम्ही पेमेंट करू शकता. त्यानंतर तुमचे आधार कार्ड तुम्ही आधार कार्डवर दिलेल्या अॅड्रेसवर पोस्टाच्या माध्यमातून पाठवण्यात येईल.