टेक डेस्क - यावर्षीचे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2019) अनेक वैशिष्ट्यांमुळे आगळे-वेगळे ठरले. अनेक स्मार्टफोन निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या 5Gस्मार्टफोनची घोषणा केली. यावेळी पॉप-अप,कॅमरा,फोल्डेबल डिस्प्ले सारखे अनेक तंत्रज्ञानाने युक्त असलेले स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले.
मात्र या ग्लोबल इवेन्टमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती फ्रान्सची मोबाईल निर्मिती करणारी कंपनी'Energizer'.या कंपनीने जगातील पहिला18,000mAh बॅटरी वाला स्मार्टफोन Energizer P18K लाँच केला आहे.मोटोरोलाच्या 5,000 एमएएच बॅटरीच्या स्मार्टफोनपेक्षाही चार पटीने जास्त पावरफुल बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली आहे.
Energizer P18K ची खास वैशिष्ट्ये
- पॉप-अप डुअल सेल्फी कॅमेरा
- बेजल लेस डिस्प्ले
- 6.2 इंचीचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
- ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप
- सेल्फी पॉप-अप कॅमेरा (सेंटर अलायंड )