महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

'Black Shark' भारतात लवकरच होणार लाँच

गेमिंग स्मार्टफोनसाठी Black Shark ही कंपनी ओळखली जाते. आता ही कंपनी भारतात ही पाऊल ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Xiaomi च्या मालकीची Black Shark कंपनी भारतातील बंगळुरू शहरात ऑफिस सुरू करणार असल्याचे समजते.

गेमिंग

By

Published : Mar 1, 2019, 7:15 PM IST

टेक डेस्क - गेमिंग स्मार्टफोनसाठीBlack Shark ही कंपनी ओळखली जाते. आता ही कंपनी भारतात ही पाऊल ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Xiaomi च्या मालकीची Black Shark कंपनी भारतातील बंगळुरू शहरात ऑफिस सुरू करणार असल्याचे समजते.

Xiaomi ने गुरुवारी २ नवीन स्मार्टफोन्स Redmi Note 7 आणि Redmi Note 7 Pro लाँच केले. आता कंपनी गेमिंग स्मार्टफोनही लवकरच भारतीय बाजारात लाँच करणार असल्याचे वृत्त आहे. कंपनीचे हेडक्वार्टर बंगळुरूमध्ये असणार आणि कंपनी तिथूनच सर्व व्यवहार सांभाळणार असल्याचे वृत्त आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसारBlack Shark चे फीचर्स

- 5.99 इंचीचा एलसीडी डिस्पले

- स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 845 चिपसेट प्रोसेसर

- ग्राफिक्ससाठी एड्रिनो 630

- अॅड्रॉईड ओरिओ 8.0 ऑपरेटिंग सिस्टम

- 6GB आणि 8 GB रॅम ऑप्शन्स

- 64 GB आणि 128 GB मेमोरी

- डुअल रिअर कॅमेरा

- प्रायमरी सेंसर 12 मेगापिक्सेल

- सेकेंडरी सेंसर २० मेगापिक्सेल

- सेल्फी कॅमेरा (20 मेगापिक्सेलचा सिंगल सेल्फी कॅमेरा)

- 4,000 एमएएच बॅटरी

- फिंगरप्रिंट स्कॅनर

ABOUT THE AUTHOR

...view details