महाराष्ट्र

maharashtra

टिकटॉकला टक्कर; औरंगाबादच्या दोन तरुणांनी तयार केले स्वदेशी 'tic toc' अ‌ॅप

By

Published : Aug 29, 2020, 5:16 PM IST

Updated : Aug 29, 2020, 7:13 PM IST

औंरंगाबादमधील तरुणांनी तयार केलेल्या व्हिडिओ अ‌ॅपचे नाव टिक टोक (Tic Toc) आहे. हे अ‌ॅप सरकारची परवानगी घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये फुलएचडी दर्जाचे व्हिडिओ दाखवण्यासाठी प्रगत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

टिक टोक
टिक टोक

औरंगाबाद -चिनी अ‌ॅप असलेल्या टिकटॉकला बंदी घालण्यात आल्यानंतर देशातील तंत्रज्ञान कंपन्यांनी व्हिडिओ अ‌ॅप बनविण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादच्या दोन तरुणांनी टिकटॉकला टक्कर देवू शकेल, असे स्वदेशी व्हिडिओ अ‌ॅप तयार केले आहे. त्यामधील काही वैशिष्ट्ये टिकटॉकपेक्षा चांगली असल्याचा दावा अ‌ॅप निर्मिती करणारे सोहेल साया व ऋषीकेश चिपाटे यांनी केला आहे.

औंरंगाबादमधील तरुणांनी तयार केलेल्या व्हिडिओ अ‌ॅपचे नाव टिक टोक (Tic Toc) आहे. हे अ‌ॅप सरकारची परवानगी घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये फुलएचडी दर्जाचे व्हिडिओ दाखवण्यासाठी प्रगत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

चिनी अ‌ॅप टिकटॉकमुळे अनेकांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले होते. अनेकांना तर आपले वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ या अ‌ॅपवर टाकण्याचे जणू व्यसनच जडले होते. मात्र भारत सरकारने बंदी आणल्यानंतर हे मिळालेलं व्यासपीठ हे कुठेतरी हरवले होते. त्यावर पर्याय म्हणून औरंगाबादच्या ऋषिकेश चिपाटे आणि सोहेल साया या दोन तरुणांनी टिकटॉकला पर्याय म्हणून टिक टोक उपलब्ध करून दिले आहे. यामुळे अनेकांना पुन्हा एकदा आपली कला जगासमोर दाखवण्याचे संधी उपलब्ध होईल, असा विश्वास या सोहेल साया व ऋषीकेश चिपाटे यांनी व्यक्त केला आहे.

टिकटॉकला औरंगाबादच्या अ‌ॅपची टक्कर

गेल्या काही वर्षांपासून चीनी असलेले टिक टॉक लोकांच्या मनोरंजनाचे एक साधन झाले होते. अनेक दिग्गज कलाकारदेखील आपले वेगवेगळे व्हिडिओ या माध्यमातून समाज माध्यमांवर टाकत होते. अनेक कलाकार टिक टॉक स्टार नावारूपाला आले होते. निखळ मनोरंजन करणाऱ्या या अप्लिकेशनवर भारत सरकारने काही दिवसांपूर्वी बंदी आणली.

टिक टोक अ‌ॅप

टाळेबंदीच्या काळामध्ये या दोन तरुणांनी जवळपास अडीच महिने परिश्रम केले. हे भारतीय अप्लिकेशन तयार करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पनांवर त्यांनी काम केले. ते तयार झाल्यावर भारत सरकारची परवानगी त्यांनी परवानगी मिळविली आहे. त्यांचा लोगो आणि पूर्ण अप्लीकेशन नोंदणीकृत करून घेण्यात आला आहे. अ‌ॅप प्लेस्टोअरच्या माध्यमातून भारतीय टिक टोक सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

ही आहेत टिक टोकचे वैशिष्ट्ये

  • या अ‌ॅपचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असणारे सर्व व्हिडिओ फुल एचडीमध्ये दिसणार आहेत.
  • या अ‌ॅपमध्ये ड्युएल मोड हे पहिल्यांदाच टाकण्यात देण्यात आहे.
  • देशात भारतीय बनावटीचे दोन ते तीन अशा पद्धतीचे अ‌ॅप आहेत.
  • वापरकर्त्याला व्हिडिओ हे १५ सेकंद, ३० सेकंद व १ मिनिटे अशा तीन पर्यायात तयार करणे शक्य आहे. टिक टोकमध्ये केवळ १५ सेकंदापर्यंतचे व्हिडिओ तयार करणे शक्य होते.
  • टिक टोकमध्ये जाहिराती दाखविण्यात येत नाहीत. तसेच बातमीचा पर्याय नाही. हे दोन्ही टिकटॉकमध्ये दिसत असल्याने वापरकर्त्याला अडथळा निर्माण व्हायचा.
  • टिक टोकमागे केवळ मनोरजंनाचा उद्देश असल्याचे चिपाटे यांनी सांगितले.

आठ दिवसांपूर्वी गुगल प्ले स्टोअरवर अप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. अ‌ॅपल कंपनीच्या मोबाईलवर देखील हे सर्वसामान्यांना वापरता येईल. चीन जर टिकटॉकसारखे अअ‌ॅप तयार करू शकते, तर आपण का नाही? या विचारातून हे अ‌ॅप तयार केल्याचे चिपाटे यांनी सांगितले. त्यासाठी टाळेबंदीचा पुरेपुर वापर केल्याचे त्यांनी सांगितले. हे भारतीय टिक टोक चिनी टिक टॉकला तोडीस तोड असेल असा दावा सोहेल साया यांनी केला आहे.

दरम्यान, चीनने पूर्व लडाखमध्ये सीमारेषेवरून तणावाची स्थिती निर्माण केल्याने भारताने चीनच्या ५६हून अधिक अ‌ॅपवर बंदी घातली आहे. त्यानंतर केंद्र सरकारने स्वदेशी व्हिडिओ अ‌ॅपच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

Last Updated : Aug 29, 2020, 7:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details