महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

व्हॉट्सअपने अटींसह बदलल्या गोपनीयतेच्या अटी

व्हॉट्सअप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. कंपनीकडून वापरकर्त्याचा डाटा आणि इतर बाबींबाबत गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्यात आले आहेत

व्हॉट्सअप
व्हॉट्सअप

By

Published : Jan 6, 2021, 3:32 PM IST

हैदराबाद- व्हॉट्सअपने ६ जानेवारीला गोपनीयतेच्या धोरणात आणि बदल केला आहे. वापरकर्त्याने या अटीचा स्वीकार केल्यानंतरच व्हॉट्सअपची सुरू झाल्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे.

व्हॉट्सअप ही फेसबुकच्या मालकीची कंपनी आहे. कंपनीकडून वापरकर्त्याचा डाटा आणि इतर बाबींबाबत गोपनीयतेच्या धोरणात बदल करण्यात आले आहेत.

व्हॉट्सअपचे असे आहे नवे धोरण-

व्हाट्सअपकडून डाटावर कशी प्रक्रिया केली जाते. डाटा कसा स्टोअर केला जातो, आदी बाबीबाबत धोरण बदलण्यात येत आहे. हे अपडेट ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. फेसबुकच्या अटी मान्य केल्यानंतर हे अपडेट होणार आहे.

हेही वाचा-रहा सावधान !...आता व्हॉट्सअ‌ॅपवर देखील होऊ शकते फसवणूक

तुमचा डाटा सुरक्षित नाही-

सायबर सेक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडियाचे महासंचालक कर्नल इंद्रजि सिंह म्हणाले की, नव्या धोरणानुसार तुम्ही जे काही व्हॉट्सअपवर शेअर करणार आहात, ते गोपनीय राहणार नाही. यामध्ये तुमचे चॅट, ग्रुप चॅट, कॉन्टॅक्ट डीपी, पेमेंटची माहिती आदींचा समावेश आहे. जरी व्हॉट्सअपकडून इन्ड टू इन्ड एनक्रिप्शनचा दावा केला जात असला तरी तुमचा डाटा सुरक्षित नाही.

हेही वाचा-नववर्षाच्या पूर्वसंध्येला व्हॉट्सअपवर जगभरात १.४ अब्ज कॉल!

व्यावसायिक कारणासाठी वापरला जातो डाटा

तुम्ही जेव्हा फेसबुक किंवा आदी कारणासाठी सोशल मीडिया वापरता तेव्हा व्यावसायिक कारणासाठी तुमचा डाटा वापरला जातो. तुमचा सर्व डाटा व्हॉट्सअप हे इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर वापरण्यात येणार आहे. तुम्ही कुठे काय करत आहात, हे फेसबुक ट्रॅक करणार आहे, असाही त्यांनी दावा केला. समाज माध्यमांकडून काहीही मोफत दिले जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, फेसबुककडे इन्स्टाग्रामसह व्हाट्सअपची मालकी आहे. तिन्ही अ‌ॅपची एकत्रिकरण कंपनीकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details