सॅन फ्रान्सिस्को- फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप नेहमीच नवनवे फिचर आणत असते. यावेळी व्हॉट्सअॅपने फिंगरप्रिंट लॉक'चे फिचर सुरू केले आहे. त्यामुळे तुमचे व्हॉट्सअॅपचे संदेश (चॅट) आता आणखी सुरक्षित राहणार आहेत.
फिंगरप्रिंट लॉक हे फिचर सुरू केल्याशिवाय व्हॉट्सअॅप सुरू करता येणार नाही. असे असले तरी वापरकर्त्याला व्हॉट्सअॅपचे कॉल स्वीकारता येणार आहेत.