सॅन फ्रान्सिस्को- व्हॉट्सअपने वापरकर्त्यांसाठी खास सुविधा आणली आहे. आयओएसच्या वापरकर्त्यांना त्यांची व्हॉट्सअप हिस्ट्रीही अँड्राईडवर पाठविणे शक्य होणार आहे.
व्हॉट्सअपमध्ये मोठी त्रुटी आहे. एकावेळी एकाच स्मार्टफोनवर व्हॉट्सअपच्या संदेशाची माहिती मिळते. फोन ऑफलाईन असतानाही व्हॉट्सअप वेब आणि डेस्कटॉपवरही व्हॉट्सअप सुरू राहू शकते. मात्र, या सेवेतही एकाच स्मार्टफोनवरील संदेश मिळू शकतात.
जर चॅट अँड्राईड आणि आयओएसमध्ये नसेल तर दुसऱ्या डिव्हाईसमध्ये तर ती माहिती सोप्या पद्धतीने पाठविणे शक्य होत नाही. अँड्राईडमध्ये डेटा रिस्टोर टूल नावाचे इन बिल्ट डिव्हाइस टू डिव्हाइस ट्रान्सफर अॅप आहे. त्याचा उपयोग अँड्राईड सेटअप विझार्डद्वारे आयओएससहित एका फोनमधून दुसऱ्या फोनमधून फोटो, अॅप आणि फाईल कॉपी करण्यासाठी केला जातो.
हेही वाचा-पीगासस हेरगिरी प्रकरण : 500 लोकांसह संघटनांकडून सरन्यायाधीशांना हस्तक्षेप करण्याची विनंती