सॅनफ्रान्सिस्को - ट्विटरचे ब्ल्यू स्टिक मिळण्याची अनेकांना प्रतिक्षा आहे. हे फीचर मिळविण्यासाठी ट्विटर पुढील आठवड्यापासून प्रोफाईल व्हेरीफेकेशन सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
विविध स्त्रोतांच्या माहितीनुसार संशोधक जेन मॅनशुम वॉँग यांनी ट्विटर व्हेरिफेकशन प्रोग्रॅम पुढील आठवड्यापासून सुरू करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-जिओ फोनकडून धमाकेदार ऑफर; दर महिन्याला मिळणार ३०० मिनिटे मोफत कॉलिंग
वाँग यांनी ब्ल्यू स्टिक मिळण्यासाठी काय पात्रता लागते, याची सविस्तर माहिती दिली आहे. ट्विटरला ब्ल्यूक स्टिक असण्यावरून अमेरिकेच्या राजकारणात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर ट्विटरने सरकारी संस्था, राजकीय नेते, कंटेन्ट क्रियटर, पत्रकार आदींसाटी विविध लेबलिंग देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा-चीपचा अपुरा पुरवठा असल्याने ह्युदांईसह किया उत्पादन प्रकल्प बंद ठेवणार
अशी असणार ट्विटरचे ब्ल्यू स्टिक मिळण्याची प्रक्रिया-
- रिपोर्टमधील माहितीनुसार ट्विटरचे अकाउंट हे चळवळीतील कार्यकर्ते, कंपनी, मनोरंजन ग्रुप, सरकारी अधिकारी, पत्रकार किंवा प्रोफेशनल स्पोर्टचे आहे, याची माहिती कंपनीकडून विचारले जाणार आहे. त्यानंतर वापरकर्त्याला ओळखपत्र ट्विटरला शेअर करावे लागणार आहे.
- वाँग यांच्या माहितीनुसार ब्ल्यू स्टिक मिळण्यासाठी होणारा पडताळणी फॉर्म, पात्रता हा त्यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आहे.
- जर ट्विटरने नवीन व्हेरिफेकेशन प्रोग्रॅम सुरू केला तर कंपनीकडून फीचरमधील होणारा नवीन बदल असेल.
- नुकतेच ट्विटरने स्पेसेस सुरू केले आहे. तसे टीप जार फीचर लाँच केले आहे. त्यामुळे क्रियटरला पैसे मिळू शकतात.
- ट्विटरकडून सबसक्रीप्शन सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.