महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

नवे फीचर : जीमेलमधील फोटो थेट गुगल फोटोत होणार जतन - जीमेल फोटो न्यूज

गुगलकडून नवीन फीचर हे १५ दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. उच्च दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ हे १५ जीबीपर्यंत १ जूनपासून प्रत्येक गुगल अकाउंटला मोफतपणे जतन करता येणार आहेत.

Gmail
जीमेल

By

Published : May 28, 2021, 3:38 PM IST

नवी दिल्ली -गुगलकडून वापरकर्त्यांचे काम सोपे होण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर लाँच करण्यात येतात. गुगलने जीमेलच्या वापरकर्त्यांना फोटोचे जतन करण्यासाठी असेच फीचर लाँच केले आहे. जीमेलच्या वापरकर्त्यांना जीमेलमधील फोटो हे थेट गुगल फोटोमध्ये जतन करण्यात येणार आहेत.


जीमेलमध्ये सेव्ह टू फोटोज हे बटन केवळ जीपीईजी फॉरमॅट असलेल्या फोटांसाठी उपलब्ध आहे. जेव्हा तुम्हाला जीमेल मेसेजमध्ये फोटो मिळतो, हा फोटो तुम्हाला सेव्ह टू फोटोज बटनवर क्लिक करून गुगल फोटोजमध्ये जतन करता येणार आहे.

हेही वाचा-राज्यात 111 लाख टन साखर शिल्लक राहणार; कारखाने आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता

गुगलकडून नवीन फीचर हे १५ दिवसांमध्ये होणार सुरू

हे फीचर वापरकर्त्यांना मोफत उपलब्ध आहे. गुगल फोटोचे फीचर डिफॉल्ट ऑन सुरू होणार आहे. गुगलकडून नवीन फीचर हे १५ दिवसांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. उच्च दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ हे १५ जीबीपर्यंत १ जूनपासून प्रत्येक गुगल अकाउंटला मोफतपणे जतन करता येणार आहेत.

हेही वाचा-जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांची केंद्रीय वाणिज्य सचिवपदी निवड


१५ जीबीपर्यंत व्हिडिओ व फोटोंचे जतन करा...
कंपनीच्या अंदाजानुसार ८० टक्क्यांहून अधिक वापरकर्ते हे तीन वर्षापर्यंत उच्च दर्जाचे फोटो व व्हिडिओ १५ जीबीपर्यंत जतन करू शकतात. जेव्हा वापरकर्त्यांने जतन केलेले फोटो आणि व्हिडिओ हे १५ जीबीपर्यंत पोहोचतात, तेव्हा गुगलकडून नोटिफिकेशन दिले जाते.

ABOUT THE AUTHOR

...view details