महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

जुन्या फोनमधून नवीन फोनमध्ये डेटा ट्रान्सफर करायचाय? वाचा... - google

आता काही असे अॅप्स उपलब्ध झाले आहेत ज्यामुळे जुना डेटा नव्या फोनमध्ये सहज ट्रान्सफर करता येतो. असेच एक अॅप आहे ज्याचे नाव आहे 'Copy My Data'.

डेटा ट्रान्सफर करण्यासाठी खास अॅप

By

Published : Mar 10, 2019, 10:08 PM IST

टेक डेस्क - नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर जुन्या फोनमधील डेटा ट्रान्सफर करणे ही एक मोठी समस्या असते. यामुळे युजरसमोर एक मोठा पेच निर्माण होतो. जुन्या फोनमध्ये असलेले फोटोज,व्हिडिओ,वैयक्तिक माहिती नवीन फोनमध्ये कशी वळवता येणार हा प्रश्न पडणे साहजिकच आहे.

मात्र काळजी करण्याचे काहीच कारण नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही या समस्येवर मात करू शकता. आता काही असे अॅप्स उपलब्ध झाले आहेत ज्यामुळे जुना डेटा नव्या फोनमध्ये सहज ट्रान्सफर करता येतो. असेच एक अॅप आहे ज्याचे नाव आहे'Copy My Data'.

जाणून घ्या कसा वापरायचा हा अॅप

- सर्वप्रथमCopy My Data'अॅप गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड करा. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जुन्या आणि नवीन दोन्ही फोनमध्ये हा अॅप डाउनलोड करावा लागेल आणि वाय-फायसोबत कनेक्ट करावे लागेल.

- हा अॅप तुमचा डेटा गुगल ड्राईव्हवर बॅकअप करुन रिस्टोर करतो. याच्या माध्यमातून तुम्ही कॉन्टॅक्ट्स आणि टेक्सट मॅसेज ट्रान्सफर करू शकता. जर तुम्ही फोन पीसीला कनेक्ट करता तर तुम्हाला डेटा ट्रान्सफरचा विकल्पही मिळणार. तुम्ही ब्लूटूथच्या सहाय्याने कॉन्टॅक्ट्स आणि टेक्स्ट मॅसेजेस नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रान्सफर करू शकता.

Files by Google

Googleचा हा अधिकृत अॅप अँड्रॉईड गो युजर्ससह स्टॉक अँड्रॉईड युजर्ससाठीही उपलब्ध आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही फाईल्स एक डिव्हाईसमधून दुसऱ्या डिव्हाईसमध्ये सोप्या पद्धतीने शेअर करू शकता.

ABOUT THE AUTHOR

...view details