नवी दिल्ली - जर तुम्ही अँड्राईड डिव्हाईसवर गुगल फोन अॅप वापरत असाल तर तुम्हाला कोण कॉल करत हे ऐकणे शक्य होणार आहे. गुगलने हे फीचर फोन अॅपमध्ये उपलब्ध केले आहे. तुम्हाला इनकमिंग येत असताना हे अॅप कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि नंबर सांगेल.
गुगल फोन अॅपने नवीन फीचर लाँच केले आहे. या फीचरमध्ये कॉलिंग करणाऱ्या व्यक्तीचे नावही वापरकर्त्याला स्क्रीनवर दिसू शकणार आहे. सध्या, अमेरिकेतील पिक्सेल फोनच्या वापरकर्त्यांना केवळ कॉलिंग करणाऱ्या व्यक्तीचे नाव समजू शकते. हे टूल लवकरच इतर देशांमध्येही उपलब्ध होणार आहे.