इस्लामाबाद- भारतापाठोपाठ टिकटॉकवर पाकिस्तानमध्ये बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, ही तात्पुरती बंदी आहे. अनैतिकता पसरत असल्याचे कारण दाखवून सिंध उच्च न्यायालयाने टिकटॉकवर बंदी लागू केली आहे.
सिंध उच्च न्यायालयाने पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन्स ऑथिरिटीला पुढील सुनावणी होईपर्यंत ८ जूनला टिकटॉक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. टिकटॉकमधून अनैतिकता पसरत असल्याची याचिका एका नागरिकाने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
हेही वाचा-VIDEO थरारक! भरधाव ऑडीच्या धडकेत रिक्षा गेली फरफटत; प्रवाशाचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये दुसऱ्यांदा टिकटॉकवर बंदी
विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये टिकटॉकमध्ये बंदी लागू होण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी पेशावर उच्च न्यायालयानेही टिकटॉकवर बंदी लागू केली होती. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये टिकॉकवर बंदी लागू करण्यात आली होती. मात्र, ही बंदी १० दिवसानंतर काढण्यात आली होती. चिनी कंपनी बाईटडान्सने सरकारी नियमांचे पालन करत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा-३१ जुलैपर्यंत 'वन नेशन, वन राशन कार्ड' लागू करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना आदेश
जून २०२० मध्ये केंद्र सरकारने चिनी अॅपवर बंदी केली होती लागू-
दरम्यान, केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेला आणि सार्वभौमपणाला धोका होत असल्याने ५९ चिनी अॅपवर जून २०२० मध्ये बंदी लागू केली. तर आणखी १८८ चिनी अॅपवर सप्टेंबर २०२० बंदी लागू केली आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अॅपवर बंदी लागू केल्याने देशात हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाहीत.
हेही वाचा-ह्रदयद्रावक : कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींची आत्महत्या
टिकटॉकसह हॅलोची मालकी असलेल्या चिनी कंपनी बाईटडान्सने देशातील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय जानेवारी २०२१ मध्ये घेतला आहे. केंद्र सरकारने अॅपवरील बंदी कायम ठेवल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. टिकटॉकचे हंगामी जागतिक प्रमुख व्हॅनेसा पापस आणि उपाध्यक्ष ब्लॅक चँडली यांनी संयुक्तपणे कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठविला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत असल्याचे म्हटले आहे. त्याचा देशातील सर्व कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार असल्याचे टिकटॉकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ई-मेलमध्ये म्हटले आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भविष्यात भारतामध्ये येण्याबाबत अनिश्चितता व्यक्त केली आहे. मात्र, वेळ आल्यावर भारतात परत येऊ, अशी त्यांनी आशाही व्यक्त केली आहे.