टेक डेस्क - जेव्हापासून इंटरनेटचा वापर वाढला आहे तेव्हापासून युजर्ससाठी अनेक कामे सुविधाजनक झाली आहेत. पूर्वी भाडेकरुंना भाडे रोख रकमेच्या स्वरुपात घरमालकाला द्यावे लागल होते. मात्र आता अॅपमुळे त्वरित खात्यात ट्रान्सफर करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अॅप्सविषयी सांगणार आहोत.
NoBroker
या अॅपच्या पे फिचरच्या माध्यमातून तुम्ही त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकता. यासह रेंटची पावतीही जनरेट करता येते. या फ्री अॅपमध्ये क्रेडिट कार्डच्या सहाय्यानेही रेंट ट्रान्सफर करता येतो.
Paytm
Paytmवॉलेटच्या मदतीने तुम्ही घरमालकाला भाडे ट्रान्सफर करू शकता. यामध्ये तुम्हाला माय पेमेंट फिचर मिळते ज्याच्या सहाय्याने तुम्ही रेंट अमाउंट सेट करुन ट्रान्सफर करू शकता. एकदा तुम्ही पेमेंट सेट केले की इन्स्टंट मनी ट्रान्सफर करता येतो. तुम्ही वॉलेट किंवा बँक अकाउंटमधूनही पेमेंट ट्रान्सफर करू शकता.