बंगळुरू- आभासी सहाय्यक (व्हर्च्युअल असिस्टंट) असलेल्या अॅमेझॉन अलेक्साने भारतात तीन वर्षे पूर्ण केली आहेत. अलेक्साला बोलून इंटरनेटवर सर्च करण्याच्या पद्धतीत बदल होताना गमतीशीर माहिती समोर आली आहे. भारतीय ग्राहकांनी २०१९ मध्ये सरासरी रोज १९ हजार वेळा अलेक्साला 'आय लव्ह यू' म्हटले आहे.
अलेक्साचे ५० टक्के ग्राहक हे महानगरांमधील आहेत. अॅमेझोन इंडियाचे (अलेक्सा) भारतीय प्रमुख पुनीश कुमार म्हणाले की, लिव्हिंग रुममध्ये अलेक्सा इको डिव्हाईसचा वापर करण्यात येतो. देशातील विविध भागांत आणि वयोगटात अलेक्साचा वापर होत असल्याचे पाहणे हा ह्रदयस्पर्शी वाटते. अलेक्साचा अनेकजणांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात स्वीकार केला आहे.
हेही वाचा-पीएमसी बँकेत गुंतवणुकीसाठी मिळाले तीन प्रस्ताव-आरबीआय गव्हर्नर