महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / lifestyle

Know about Car Insurance Policy : जाणून घ्या, वाहनाच्या विमा पॉलिसीची कशी निवड करायची?

वाहनांच्या विम्याचे ( types of car Insurance ) दोन प्रकार पडतात. सर्वसमावेशक आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स (third party Insurance) हे विम्याचे प्रकार आहेत. हे ऑनलाइन ( online car Insurance buying ) आणि ऑफलाइन ( offline car Insurance buying ) दोन्ही पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात. बरेच लोक पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण ( renew insurance policy ) करण्यास प्राधान्य देतात.

वाहन विमा
वाहन विमा

By

Published : Dec 21, 2021, 2:20 AM IST

Updated : Dec 21, 2021, 3:00 AM IST

हैदराबाद - अनेकांचे स्वत:च्या कारमधून प्रवास करण्याचे स्वप्र असते. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करतात, मात्र वाहनांची विमा पॉलिसी ( Car Insurance Policy) घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते. तर, जाणून घ्या, वाहनांच्या विमा पॉलिसीची निवड कशी ( Tips for buying car insurance ) करावी?

वाहनाचा अपघात झाल्यानंतर ग्राहकांना विमा न काढल्याची खंत वाटते. काही जण भविष्यात परिणमांची काळजी घेत विमा काढतात, तर अन्य नागरिक अपघातानंतर विमा कंपन्यांशी संपर्क साधतात. तर आज आपण वाहनांच्या विम्या संदर्भात जाणून घेणार आहोत.

हेही वाचा-Gita Gopinath On IMF : गीता गोपीनाथ बनणार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक

वाहनांच्या विम्याचे (car Insurance) दोन प्रकार पडतात. सर्वसमावेशक आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स (third party Insurance) हे विम्याचे प्रकार आहेत. हे ऑनलाइन (online) आणि ऑफलाइन (offline) दोन्ही पद्धतीने उपलब्ध होऊ शकतात. बरेच लोक पॉलिसीचे ऑनलाइन नूतनीकरण ( renew insurance policy ) करण्यास प्राधान्य देतात. त्यासाठी विम्या कंपन्यांचे हेल्प डेस्क आहेत. मात्र, नवीन कार विमा किंवा नूतनीकरण करताना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. अनेकांना कमी पैशात पॉलिसी काढण्याची घाई असते. तसे न करता तुमच्या गरजा पूर्ण करणारी पॉलिसी निवडणे हे कधीही चांगले असेल. त्यासाठी शक्य तितके पूर्ण संरक्षण देणारी पॉलिसी निवडणे अधिक योग्य असते. त्यामध्ये थर्ड पार्टी इन्शुरन्सचा समावेश असणे अधिक फायद्याचे आहे.

हेही वाचा-LPG Gas Cylinder Weight : घरगुती गॅस सिलेंडरचे वजन होणार कमी - हरदिप सिंग पुरी

किरकोळ अपघात झाला तरी दुरुस्तीसाठी हजारो रुपये खर्च होऊ शकतो हे विसरू नका. यामुळे फक्त कायदेशीर नियमांची पुर्तता करण्यासाठी पॉलिसी काढण्याची प्रवृत्ती सोडली पाहिजे. विम्याचा भत्ता कमी आहे, म्हणून पॉलिसी निवडू नका. विमा कंपनीचा क्लेम सेटलमेंटचा इतिहास आणि पुरवण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेऊन निर्णय घ्या. तसेच, मुदतीपुर्वी पॉलिसीचे नूतनीकरण केले पाहिजे. अन्यथा, नो क्लेम बोनस (NCB) गमावण्याची धोका आहे. त्यामुळे अंतिम मुदत संपण्यापुर्वी नुतनीकरण करण्यास विसरु नका. तुम्ही नवीन कार खरेदी करता तेव्हा तुमची जुनी कार नो क्लेम बोनस पद्धतीने हस्तांतरित केली जाऊ ( how to transfer No Claim Bonus ) शकते. याबाबत विमा कंपनीशी चर्चा करा. तसेच, कोणत्याही परिस्थितीत फसव्या विम्यांच्या दाव्यांवर विश्वास ठेवू नका. कारण हा दंडनीय गुन्हा आहे.

हेही वाचा-दुचाकीसह चारचाकीवरील विमाही १६ जूनपासून महागणार, असे असतील नवे दर

Last Updated : Dec 21, 2021, 3:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details