अकोला- लहान मुलांच्या कारणावरून अकोट तालुक्यातील मोहोळा येथे काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह ९ जणांनी गावातील भाजपचे अल्पसंख्याक सेलचे कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यातील आणखी दोन आरोपींना ग्रामीण पोलिसांनी दर्यापूर येथून अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपींची संख्या आता ३ झाली आहे.
मतीन पटेल खून प्रकरणात आणखी दोघे अटकेत - अकोट
मतीन पटेल खून प्रकरणात आणखी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
अकोट तालुक्यातील मोहोळ गावामध्ये भाजपचे कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यावर हिदायत पटेल आणि ९ जणांनी मिळून लाठीकाठी, धारदार शस्त्राने 24 मे रोजी सायंकाळी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात ते जागीच ठार झाले. लहान मुलांच्या कारणावरून हा प्रकार घडला. यामध्ये अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात खून करणे, प्राणघातक हल्ला करणे व दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये अकोट पोलिसांनी दुसऱ्या दिवशी इस्ताकउल्लाखा असफाकउल्लाखा यास अटक केली. तर आणखी दोघे शोएबउल्ला पटेल, फरीदउल्ला पटेल या दोघांना अकोट ग्रामीण पोलिसांनी दर्यापूर येथून अटक केली आहे. तर यातील काँग्रेसचे उमेदवार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल हे अद्याप ही फरार आहे.