महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / jagte-raho

अपहृत बालकाच्या खुनाचा पोलिसांकडून उलगडा; एकतर्फी प्रेमातून तरुणाने केले कृत्य

सातारा जिल्ह्यातील बालकाच्या खुनाला वेगळे वळण लागले आहे. खून प्रकरणाचे धागेदोरे हे एकतर्फी प्रेमापर्यंत पोहोचले आहेत.

बालक
बालक

By

Published : Oct 2, 2020, 1:14 PM IST

Updated : Oct 2, 2020, 3:06 PM IST

सातारा - फलटण तालुक्यातील अपहृत बालकाच्या खुन्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी संशयित तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. एकतर्फी प्रेमातून त्याने हे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

फलटण तालुक्यातील पंढरपूर - पुणे पालखी मार्गावर काळज हे गाव आहे. तेथील रामनगर भागात राहणारे त्रिंबक भगत यांच्या १० महिन्यांच्या मुलाचे मंगळवारी अपहरण झाले होते. गुरुवारी बालकाचा मृतदेह घरालगतच्या विहिरीत पोलिसांना सापडला होता. अवघ्या १० महिन्यांच्या बालकाचे अपहरण आणि नंतर खून अशा धक्कादायक घटनांमुळे समाजमन हेलावले होते.

पोलिसांसमोर तपासाचे होते मोठे आव्हान-

पोलिसांची तब्बल ९ पथके या बालकाचा शोध घेत होती. बालकाचा मृतदेह सापडल्याने त्याचे अपहरण कोणी केले ? खून कोणी केला ? कशासाठी हा प्रकार झाला? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा या गुन्ह्याच्या अनुषंगाने निर्णायक धागेदोरे मिळतात का? याच्या मागावर होती.

अखेर या मागील गुंता सोडवून संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सातारा जिल्हा पोलिसांना यश आले. गुरुवारीत तडवळे (ता. फलटण) येथील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्यानेच या बालकाचे अपहरण व खून केल्याचे उघड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या पत्रकार परिषद घेऊन आज सायंकाळी देणार आहेत.

Last Updated : Oct 2, 2020, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details