पुणे - लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या पथकाने पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी एका लष्करी जवानासह सहा जणांना ताब्यात घेतले. बनावट भारतीय चलन आणि विदेशी बनावटीचे चलन, असे एकुण 87 कोटी मुल्याची रक्कम जप्त करण्यात आले आहे.
पुणे विमानतळ परिसरातून बनावट चलन जप्त, नोटांची किंमत 87 कोटी - Pune fake currency news
विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी जेरबंद केले. एका लष्करी जवानासह सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत बनावट भारतीय चलन आणि विदेशी बनावटीचे चलन, असे एकून 87 कोटी मुल्याची रक्कम केले.
जप्त केलेल्या नोटा व बंदूक
पोलिसांनी या प्रकरणी शेख अलीम गुलाब खान, सुनील भद्रीनाथ सारडा, रितेश रत्नाकर, तोफिल अहमद मोहमद इसाक खान, अब्दुल गणी रेहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गणी खान यांना ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा -पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले नवे 78 कोरोनाबाधित रुग्ण, तर 2 जणांचा मृत्यू
Last Updated : Jun 11, 2020, 12:02 PM IST