ठाणे - गँगस्टर एजाज लकडावालाच्या नावाने कल्याणच्या एका व्यापाऱ्याला २ कोटींची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. महारूफ गुलाम मूर्तजा खोटाल (वय-५० वर्ष) यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा - भूमिपुत्रांना नोकरीत आरक्षण.. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अन् १० रुपयात थाळी, राज्यपालांचे आश्वासन
कुख्यात गँगस्टर एजाज लकडावाला याने आपल्या हस्तकांमार्फत खंडणीसाठी धमक्या आणि वसुलीचे सत्र सुरू केल्याचे या प्रकरणामुळे पुढे आले आहे. कल्याणच्या दूध नाका परिसरात महारूफ गुलाम मूर्तजा खोटाल हे दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. दररोज त्यांची लाखोंची उलाढाल असते. २२ नोव्हेंबरला दुपारी ते मित्रांसह नाशिकला निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला. 'मी एजाज लकडावाला बोलतोय...जीव प्यारा असेल तर २ खोके तयार ठेव, नाही तर ठोकून टाकीन,' असे फोनवरून त्यांना धमकावण्यात आले.
हेही वाचा - पुणे: गटारीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पाचजण अडकले