पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरातील भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 13 वर्षीय मुलीचे 19 वर्षीय तरुणाशी बालविवाह लावून दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीचे आई, वडिल, नवरदेव व त्याच्या आई-वडिलावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पाचही जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार अल्पवयीन मुलीने एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या माध्यमातून समोर आणला आहे.
माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे मात्र, गंभीर घटना असल्याने संबंधित महिलेने जीविताला धोका असल्याचे सांगत कॅमेऱ्यापुढे बोलण्यास नकार दिला आहे. या सर्व घटने प्रकरणी महिला सामाजिक कार्यकर्त्यांनीच पोलिसात तक्रार दिली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी आई आणि सावत्र वडील आहेत. ते मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करतात. दरम्यान, जवळच राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी अल्पवयीन मुलीचा विवाह लावून द्यायचे ठरले. त्याप्रमाणे 9 जूनला अल्पवयीन 13 वर्षीय मुलीच्या 19 वर्षीय तरुणाशी बालविवाह लावून देण्यात आला. हा विवाह मुलीला मान्य नव्हता, दोन महिन्यांनंतर अल्पवयीन मुलीने तोंड ओळखीतील सामाजिक कार्यकर्त्या महिलेशी संपर्क साधला. याबाबत त्यांनी भोसरी पोलिसात धाव घेत संबंधित बालविवाह उजेडात आणला असून गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आई, सावत्र वडील, पती व त्याच्या आई-वडिलाला अटक करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्त्या महिलेला भीती....!ज्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेने हे प्रकरण समोर आणले आहे. त्यांना संबंधित आरोपीकडून जीविताला धोका असल्याचे सांगून कॅमेऱ्यापुढे बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेत नावाचा उल्लेख न करता गोपनीयता बाळगण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.