अमरावती -अवैधरित्या देशी दारुची एका चारचाकी वाहनातून वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अमरावतीच्या माऊली जहागीर पोलीस ठाणे अंतर्गत अटक करण्यात आली आहे. यात दोन लाख रुपये किंमतीच्या तब्बल 24 देशी दारुच्या पेट्या व 72 हजार रुपयांचे चारचाकी वाहन, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमरावती : अवैधरित्या दारुची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना अटक - अमरावती गुन्हे बातमी
अमरावतीच्या माऊली जहागी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकीतून अवैध देशी दारुची वाहतूक करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून देशी दारुसाठा व चारचाकी वाहन, असा 2 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रवीण रामदाजी ढोबाळे, विजय नथुजी वानखडे, हर्षद प्रकाश होले, पंकज हिम्मतराव हरणे व अमोल रमेश ढोके, या पाच जणांचा ताब्यात घेण्यात आले आहे.
यावली ते डवरगाव दरम्यान अवैध देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली होती. त्यानुसार नाकाबंदी करून पोलिसांनी एका चारचाकीतून देशी दारुच्या तब्बल चोवीस पेट्या व चारचाकी ताब्यात घेतली आहे. ही कारवाई अधीक्षक हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय आखरे यांच्या पथकाने केली.