सॅन फ्रान्सिस्को Xi Jinping Meets joe Biden: चीननं इतर देशाच्या एक इंच भूभागावर कब्जा केला नाही, असं मत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी गुरुवारी केला. चीननं कोणताही संघर्ष भडकावला नाही, असंही त्यांनी आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन शिखर परिषदेत (APEC) स्पष्ट केलं. शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी डिनरच्या वेळी त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं. चीननं भारताच्या भूभागावर ताबा घेतल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी केला आहे. काँग्रेसनं अनेकदा चीननं भारताच्या भूभागावर कब्जा केल्याचा दावा केला, मात्र शी जिनपिंग यांच्या या दाव्यानं आता पुन्हा हा वाद उफाळून येणार आहे.
शिखर परिषदेत शी जिनपिंग आणि जो बायडन यांची भेट :अमेरिका आणि चीन व्यावसायिक परिषद आणि अमेरिका चीन संबंधावरील राष्ट्रीय समितीनं या शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी शी जिनपिंग यांनी मागील 70 वर्षात चीननं कोणताही संघर्ष किंवा युद्ध भडकावलं नसल्याचं स्पष्ट केलं. चीननं एक इंचदेखील परदेशी भूभागावर कब्जा केला नसल्याचं शी जिनपिंग यांनी यावेळी सांगितलं.
तिबेट हाँगकाँगसह मानवाधिकाराच्या उल्लंघनावर चर्चा :जो बायडन आणि शी जिनपिंग यांच्या दरम्यान रात्री भोजनाच्या वेळी चांगलीच चर्चा झाली. जो बायडन यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत तिबेट, हाँगकाँगसह चीनच्या मानवाधिकारांच्या उल्लंघनावर चिंता व्यक्त केली. मात्र शी जिनपिंग यांनी एक इंच परदेशी भूभागावर चीननं कब्जा केला नसल्याचा दावा केल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली चिंता व्यक्त :व्हाईट हाऊसनं शी जिनपिंग आणि जो बायडन यांच्या भेटीवर निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चीनमध्ये मानवी हक्कांच्या होणाऱ्या उल्लंघनावर चर्चा केल्याचं स्पष्ट करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय मानवाधिकाराचं संरक्षण करणं ही सगळ्या देशाची जबाबदारी असल्याचं स्पष्ट केलं आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत तिबेट आणि हाँगकाँगसह मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली, असंही नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचा :
- State dinner at White House : स्टेट डिनरच्या मैफीलीत पंतप्रधान मोदींनी केला विनोद, पहा व्हिडिओ
- Joe Biden reach Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू, 'या' मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता