महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

इराणमध्ये जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ भीषण स्फोट, 100 हून अधिक जणांचा मृत्यू - जनरल सुलेमानी

Iran Blast : इराणमध्ये बुधवारी दोन भीषण स्फोट झाले. या स्फोटामध्ये आतापर्यंत 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी आहेत.

Iran Blast
Iran Blast

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2024, 8:17 PM IST

Updated : Jan 3, 2024, 8:24 PM IST

तेहराण Iran Blast : बुधवारी (3 जानेवारी) इराणमधील माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या कबरीजवळ दोन मोठे स्फोट झाले. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 103 जणांचा मृत्यू झाला असून 141 जखमी आहेत. इराणचे माजी जनरल कासिम सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कबरीजवळ आयोजित समारंभाला लक्ष्य करून हे स्फोट घडवण्यात आल्याचा अंदाज आहे.

स्फोट कशामुळे झाला : रिपोर्टनुसार, पहिला स्फोट इराणच्या केरमन शहरात माजी इराणी लष्कर जनरल सुलेमानी यांच्या कबरीजवळ झाला. त्यानंतर लगेच दुसरा स्फोट झाला. रस्त्याच्या कडेला असलेल्या स्मशानभूमीजवळ हा स्फोट झाला. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक गॅस कंटेनरचा स्फोट झाल्याचं कळतंय. मात्र स्थानिक अधिकाऱ्यांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही. हा स्फोट गॅस सिलिंडरमुळे झाला की आणखी कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेला दहशतवादी हल्ला मानण्यात येत आहे.

स्फोटांनंतर चेंगराचेंगरी : वृत्तानुसार, ज्या स्मशानभूमीत हे बॉम्बस्फोट झाले, त्याच ठिकाणी माजी जनरल सुलेमानी यांची कबर आहे. बॉम्बस्फोट झाला तेव्हा त्यांच्या मृत्यूची चौथा स्मृतिदिन साजरा होत होता. स्फोटानंतर घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीमुळे अनेक जण जखमी झाल्याचं बोललं जातंय. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

कोण होते जनरल सुलेमानी : जनरल सुलेमानी 3 जानेवारी 2020 ला बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारले गेले होते. सुलेमानी हे इराणमधील शक्तिशाली व्यक्तिमत्त्व होते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यानंतर त्यांना देशातील दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानलं जात होतं. ते इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या परदेशी ऑपरेशन्स शाखेच्या कुड्स फोर्सचे कमांडर होते. त्यांनी हमास आणि हिजबुल्लाह तसेच अनेक सशस्त्र गटांना ट्रेनिंग दिलं होतं. 2020 मध्ये, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी, सुलेमानी यांच्या मृत्यूचं मोठा विजय म्हणून वर्णन केलं होतं. तसंच त्यांनी सुलेमानी यांना जगातील नंबर एक दहशतवादी देखील म्हटलं होतं.

हे वाचलंत का :

  1. जपानच्या दोन विमानांची जोरदार टक्कर; जपान एअरलाइन्सच्या विमानाला आग, पाच क्रू मेंबर्सचा मृत्यू
  2. भूकंपाच्या धक्क्यानं जपान हादरलं; आठ नागरिकांचा मृत्यू, जपानमध्ये त्सुनामीचा इशारा
Last Updated : Jan 3, 2024, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details