कराची- पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीजवळ आत्मघातकी हल्ल्यात झालेल्या स्फोटानं खळबळ उडालीय. या बॉम्बस्फोटात किमान 52 जण ठार आणि 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रेषित मुहम्मद यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा या स्फोटात मृत्यू झाला. मस्तुंग जिल्ह्यातील अल फलाह रोडवरील मदिना मशिदीजवळ हा बॉम्बस्फोट झाला.
धक्कादायक बाब म्हणजे मिरवणुकीत ऑन ड्युटी असलेले मस्तुंगचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचाही मृत्यू झाला आहे. सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट होता. अज्ञात व्यक्तीनं डीएसपीच्या कारच्या शेजारी स्वत: बॉम्बस्फोट घडवून आणला. अद्याप, हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.
बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता संपविण्याचा डाव-बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं. जखमी झालेल्या नागरिकांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. बलुचिस्तानचे हंगामी माहिती मंत्री जान अचकझाई यांनी बॉम्बस्फोटाविषयी माहिती दिलीय. मंत्री अचकझाई म्हणाले, मदत पथके मस्तुंग येथील घटनास्थळे रवाना करण्यात आली आहेत. तर गंभीर जखमींना क्वेटा येथे हलवण्यात येत आहे. आमच्या शत्रुंना बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता संपवायची. हा स्फोट सहनशक्तीपलीकडचा आहे.बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. स्फोटानंतरही शुक्रवारच्या नमाजासाठी पंजाब पोलिसांनी मशिदींमध्ये सुरक्षा कर्तव्ये पार पाडली आहेत. कराची अतिरिक्त महानिरीक्षक खादिम हुसेन रिंद यांनी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दहशतवादाविरुद्ध नागरिकांनी एकजूट दाखवा-हंगामी मुख्यमंत्री अली मर्दान डोमकी यांनी बॉम्बस्फोटाची गांभीर्यानं दखल घेतली आहे. त्यांनी स्फोटासाठी दोषी असलेल्यांना तातडीनं अटक करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आरोपींना कोणत्याही प्रकारं माफ करण्यात येणार नाही. शांततापूर्ण काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांना लक्ष्य केले तर त्यांच्यावर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असा त्यांनी इशारा दिलाय. इस्लाम हा शांततेचा धर्म असून दहशतवादी कृत्य करणाऱ्यांना मुस्लिम म्हणता येणार नाही. दहशतवादाविरुद्ध नागरिकांनी एकजूट दाखवावी, असे त्यांनी आवाहन केले.
हेही वाचा
- Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बाॅम्बस्फोट प्रकरणातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात उशिरा हजर, पुढील सुनावणी होणार 'या' तारखेला
- Pakistan Bomb Blast : दहशतवादाचं नंदनवन बॉम्बस्फोटानं हादरलं, उत्तर वझिरीस्तानमध्ये बॉम्बस्फोटात 11 मजूर ठार