बर्लिन ( जर्मनी ) :उत्तर जर्मनीच्या हॅम्बुर्ग शहरात गुरुवारी संध्याकाळी चर्चमध्ये जोरदार गोळीबार झाला. या घटनेत अनेक जण ठार झाले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत असे पोलिसांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची परिस्थिती काय आहे त्याबद्दल कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेतील सहा ते सात मृत्यू झाला त्यांची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. गोळीबारात 6 जणांचा मृत्यू, 8 जखमी झाले आहेत.
पोलिसांना गोळीबाराची सूचना :होल्गर व्हेरेन म्हणाले की, रात्री 9:15 च्या सुमारास पोलिसांना गोळीबाराची सूचना मिळाली. त्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहचले. तेथे दाखल झाल्यावर त्यांना गोळीबारात जखमी झालेले लोक आढळून आले. त्यानंतर त्यांना वरच्या मजल्यावरून गोळीबाराचा आवाज आला. होल्गर व्हेरेन यांनी सांगितले की शूटर पळून जाताना त्यांना दिसलाच नाही. तो तिथेच कुठेतरी होता.
घटनेवर प्रतिक्रिया : जवळच राहणारी विद्यार्थिनी लॉरा बाउच म्हणाली, गोळीबाराचा सुमारे चार वेळा आवाज झाला. सध्या अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अंदाजे 20 सेकंद ते एक मिनिटाच्या अंतरात हा गोळीबार झाला. तिने सांगितले की, तिने खिडकीतून बाहेर पाहिले आणि एक व्यक्ती तळमजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर पळत असल्याचे दिसले. त्यानंतर जवळच राहणारा ग्रेगोर मिस्बॅक, गोळीबाराच्या आवाजाने सावध झाला. त्याला खिडकीतून इमारतीत प्रवेश करणारी एक व्यक्ती दिसली. त्यानंतर आतून गोळीहाराचा आवाज ऐकू आला. नंतर गोळीबार करणारा हॉलमधून बाहेर येत अंगणात आला आणि नंतर सुद्धा गोळीबार केला.
25 वेळा गेळीबार : मिस्बॅकने जर्मन टेलिव्हिजन न्यूज एजन्सी नॉनस्टॉप न्यूजला सांगितले की, किमान 25 वेळा गेळीबार झाला. पोलीस आल्यानंतर पाच मिनिटात शेवटचा आवाज आला, असे तो म्हणाला. गोळीबार झाला तेव्हा इमारतीत सुरू असलेल्या घटनांची पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती. होल्गर व्हेरेन म्हणाले की घटना अद्याप पूर्णपणे अस्पष्ट आहे. हॅम्बर्गचे महापौर पीटर त्शेन्चर यांनी ट्विट केले की ही घटना धक्कादायक होती. पीडितांच्या नातेवाईकांना सहानुभूती दिली.
हेही वाचा :India China Tension and Conflict : यूएस इंटेल समुदायाची वाढली भीती; भारत-पाक, भारत-चीनमध्ये संघर्ष होण्याची शक्यता