महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Russia Ukraine War 56th day : रशियाने पूर्व युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे युद्ध अधिक हिंसक - संयुक्त राष्ट्र महासचिव - russian foreign minister sergey lavrov

युक्रेन गेल्या ५५ ​​दिवसांपासून युद्धाच्या झळ्या सोसत आहेत. अनेक लोक मारले जात आहेत. जगभरातील महाशक्ती युद्ध संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या प्रयत्नांचे आतापर्यंत कोणतेही सकारात्मक परिणाम दिसून आलेले नाहीत. रशियाने पूर्व युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे युद्ध अधिक हिंसक आणि विध्वंसक बनले आहे, असे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. आज युद्धाचा 56 वा दिवस आहे. रशिया युक्रेनच्या भूमीवर कहर ( russia ukraine war ) करत आहे.

रशिया युक्रेन युद्ध
रशिया युक्रेन युद्ध

By

Published : Apr 20, 2022, 2:18 PM IST

कीव - रशियासमोर युक्रेन कधीही झुकू शकतो. कारण रशियाकडून दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनच्या शहरांचा रोजच विध्वंस करण्यात येत आहे. चेचन्याच्या रशियाचा पाठिंबा असलेल्या चेचेन्यांच्या मते रशियन सैन्य काही तासांत मारियुपोलच्या मुख्य बंदरात युक्रेनचा बिमोड करणार आहे. दुसरीकडे, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे की, रशियाने पूर्व युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे हे युद्ध अधिक हिंसक आणि विनाशकारी बनले आहे. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश युक्रेनला शस्त्रे पुरवत असल्याचा रशियाने आरोप केला आहे. त्यामुळे युद्ध अधिक काळ चालणार असल्याचे दिसून येत आहे.

रशियाचा पाठिंबा असलेले चेचेन्या नेते रमजान कादिरोव्ह ( Ramzan Kadyrov on ukraine war ) यांनी सांगितले, की रशियन सैन्य युक्रेनचा मारियुपोलमधील प्रतिकार संपुष्टात आणणार आहे.

मारियुपोलवर रशियन सैन्याचा ताबा-शहरातील युक्रेनियनचे नियंत्रण असलेली स्टील मिल ही शेवटची जागा आहे. ही मिल रशिया ताब्यात घेणार आहे. रशियन नाकेबंदी आणि अथक हल्ले करूनही युक्रेनियन सैन्याने अझोव्ह समुद्रावरील मोक्याच्या बंदराचे सात आठवडे संरक्षण केले आहे. तर शहराचा बराचसा भाग रशियन सैन्याने ताब्यात घेतला आहे. अझोव्हस्टल प्लांट सुमारे 11 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. युक्रेनियन सैन्याने भूगर्भातील बोगदे आणि डेपोच्या विशाल नेटवर्कद्वारे रशियन सैन्याला जोरदार प्रतिकार केला आहे. कादिरोव्हचे सैन्य मारियुपोलमध्ये रशियन बाजूने लढत आहे.

पूर्व युक्रेनमध्ये रशिया आक्रमक- संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस ( United Nations Secretary General antonio guterres ) म्हणाले की रशियाच्या पूर्व युक्रेनवरील आक्रमणामुळे युद्ध अधिक हिंसक, रक्तरंजित आणि विनाशकारी बनले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पत्रकारांशी बोलताना, गुटेरेस यांनी गुरुवारपासून सुरू होणार्‍या चार दिवसांच्या पवित्र आठवड्यात आणि इस्टर रविवार, 24 एप्रिल रोजी हल्ले थांबवण्याची मागणी केली. युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी अनेक बाजूंनी केलेले प्रयत्न अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी निराशा व्यक्त केली. गुटेरेस म्हणाले की चार दिवसांचा इस्टर कालावधी हा युक्रेनचे दुःख संपवण्यासाठी व लोकांमधील संवाद वाढवण्यासाठी असावा.

रशियाच्या संरक्षणमंत्र्यांची अमेरिकेवर टीका-रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी ( russian foreign minister sergey lavrov ) अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांवर युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवल्याचा आरोप केला. युक्रेनमधील रशियाची विशेष लष्करी कारवाई लांबणीवर टाकण्यासाठी अमेरिका आणि त्याचे सहयोगी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा आरोप शोईगु यांनी सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत केला. ते म्हणाले, मॉस्को-समर्थित फुटीरतावादी गेल्या आठ वर्षांपासून बहुतेक रशियन भाषिक प्रदेशात युक्रेनियन सैन्याशी लढा देत आहेत. त्यांनी दोन स्वतंत्र प्रजासत्ताक घोषित केली आहेत. रशियानेही त्यांना मान्यता दिली आहे. युक्रेनमधील खार्किव येथे रशियन हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

शरण येतील ते वाचतील- खार्किव प्रदेशाचे गव्हर्नर ओलेह सिनेहुबोव्ह यांनी मंगळवारी सांगितले की, शहराच्या मध्यभागी आणि बाहेरील भागात रशियन रॉकेट हल्ल्यात 17 रहिवासीदेखील जखमी झाले आहेत. खार्किव हे युक्रेनचे दुसरे सर्वात मोठे शहर आहे. 24 फेब्रुवारी रोजीपासून रशियन आक्रमण सुरू झाले आहे. रशियन सैन्याने मारियुपोलमधील युक्रेनियन सैन्याला मंगळवारी दुपारपर्यंत आत्मसमर्पण करण्याची संधी दिली आहे. जे शरण येतील ते वाचतील, असा रशियन सैन्यदलाने इशारा दिला आहे. सात आठवडे शहराचे रक्षण करणारे युक्रेनियन सैनिक रशियन सैन्याला दाद देत नाहीत.

हेही वाचा-Russia-Ukraine War 53Th Day : युक्रेनियन निर्वासितांना अमेरिकेकडून 10 लक्ष डॉलर्सच्या मदतीची घोषणा

हेही वाचा-Russia-Ukraine War 54th day : युक्रेनचा मारियुपोलमध्ये आत्मसमर्पण करण्यास नकार

हेही वाचा-Russia-Ukraine War : रक्तरंजित संघर्ष! रशिया-युक्रेन युध्द अधिक तीव्र; लिव्हमध्ये 7 ठार

ABOUT THE AUTHOR

...view details