वॉशिंग्टन डीसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. यावेळी अमेरिकेच्या फर्स्ट लेडीदेखील मोदींच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. यावेळी जो बायडेन यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले. यावेळी जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
बायडेन-मोदींमध्ये द्विपक्षीय चर्चा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये मोदी आणि बायडेन यांची समोरासमोर बैठक झाली. संरक्षण, अंतराळ, ऊर्जा आणि तंत्रज्ञानासह भारत-अमेरिका धोरणात्मक संबंधांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी उच्चस्तरीय चर्चेसाठी भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा चर्चा - व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये मोदी आणि बायडेन यांची समोरासमोर बैठक झाली. त्यानंतर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली आहे. 24 तासांत दोन्ही नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा चर्चा झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी अधिकृत चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदींचे व्हाईट हाऊसमध्ये स्वागत करण्यात आले.
दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे 21 व्या शतकातील सर्वात महत्त्वाचे नाते आहे. आज दोन्ही देशांनी घेतलेले निर्णय पुढील पिढ्यांचे भविष्य ठरवतील. व्हाईट हाऊसमधील रिसेप्शनमध्ये उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग्लस एमहॉफ उपस्थित होते.
मोदींनी मानले बायडेन यांचे आभार -पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संबोधन आणि जोरदार स्वागताबद्दल मी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट ले़डी यांचे आभार मानतो. या मैत्रीबद्दल बायडेन यांचे धन्यवाद मानतो. हा 140 करोड देशवासियांचा गौरव आहे. हा सन्मान 4 मिलीयन भारतीयांचा आहे. याबद्दल मी बायडेन यांचा आभार व्यक्त करतो. मी अनेकवेळा येथे आलो पण इवढ्या मोठ्या संख्येने भारतीय नागरिक व्हाईट हाऊसबाहेर पहिल्यांदाच उपस्थित आहेत. भारतीय नागरिक हे मेहनतीने अमेरिकेत काम करून भारताचा गौरव करत आहेत.
व्हाईट हाऊसबाहेर मोठी गर्दी - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय बैठक गुरुवारी (22 जून) पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी व्हाईट हाऊसच्या दक्षिण लॉनबाहेर भारतीय नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ‘भारत माता की जय’ आणि ‘मोदी मोदी’ अशा घोषणांनी व्हाईट हाऊसचा परिसर दणाणला होता.
मोदी-बायडेनमध्ये चर्चा - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी अनेक विषयांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत मोदींनी चर्चा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेला देखील संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिकेच संबंध आणखी घनिष्ठ होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये आणखी कोणत्या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा -
- PM Modi US Visit : भारतीयांसाठी व्हिसा प्रणाली सुलभ होणार; बायडेन सरकार पॉझिटिव्ह
- PM USA State Dinner Menu: पंतप्रधानांसाठी बायडेन सरकारने तयार केला खास मेन्यू, जाणून घ्या सविस्तर
- PM Modi meets Jill biden: शिक्षण हा भारत आणि अमेरिका यांच्यातील सखोल संबंधांचा आधारस्तंभ: जिल बायडेन