समरकंद ( उझबेकिस्तान ): PAK PM Shehbaz Sharif शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ( एससीओ ) च्या वेळी Shanghai Cooperation Organization meeting रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन Russian President Putin यांच्याशी द्विपक्षीय चर्चेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये हास्याचे पात्र बनले. रशियन सरकारी वृत्तसंस्था आरआयएने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहबाज शरीफ हे हेडफोन लावत असताना गोंधळलेले पाहावयास मिळाले. त्यावेळी पुतीन यांनाही हसू आवरले नाही.
हा व्हिडिओ पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) ने देखील शेअर केला आहे. त्यात हे देखील दिसून आले की शहबाज एका सहाय्यकाला मदतीसाठी विचारत होते. परंतु सहाय्यकाच्या मदतीनंतरही त्यांचे हेडफोन पुन्हा खाली पडले. पीटीआयच्या एका सदस्याने सांगितले की, शेहबाज हे पाकिस्तानसाठी सतत लाजिरवाणे आहेत.