बिजींग Mysterious Pneumonia Outbreak in China : कोरोना महामारीमुळं सबंध जगाची झोप उडवणाऱ्या चीनमध्ये आता आणखी एका नव्या आजारानं मोठ्या प्रमाणावर थैमान घातलंय. चीनमधील अनेक शाळांमध्ये नवा आजार वेगानं पसरत आहे. चीनच्या शाळांमधील मुलांमध्ये न्यूमोनिया आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय. या चिंताजनक परिस्थितीमुळं कोरोनाच्या संकटाच्या पूर्वीची स्थिती दिसू लागली आहे.
रहस्यमय आजारानं अनेक शाळा बंद : चीनमधील बीजिंग आणि लिओनिंग इथं मोठ्या संख्येनं लहान मुलांना रुग्णालयात दाखल केलं जातंय. स्थानिक मीडिया माहितीनुसार या रहस्यमय न्यूमोनियाच्या आजारामुळं देशातील अनेक शाळा बंद आहेत. दरम्यान, न्यूमोनियानं बाधित झालेल्या मुलांमध्ये फुफ्फुसात सूज येणं आणि ताप येणं, यासह असामान्य लक्षणं दिसून येत आहेत. मात्र, खोकला, आरएसव्ही आणि श्वसन रोगांशी संबंधित इतर लक्षणं त्या मुलांमध्ये दिसून येत नाहीत.
कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा WHO चा ठपका : या नवीन आजाराबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) सांगितलं की, चिनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या अधिकाऱ्यांनी 12 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि चीनमध्ये श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिलीय. WHO नं या रहस्यमयी आजाराच्या उद्रेकासाठी कोविड-19 निर्बंध शिथिल केल्याचा ठपका ठेवलाय. WHO नं आजारी मुलांमध्ये इन्फ्लूएंझा, SARS-CoV-2, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया यासंबंधी अतिरिक्त माहिती मागवलीय. विशेष म्हणजे चीनमध्ये आजारी पडण्याच्या अलीकडील घटनांमध्ये कोविडसारखीच लक्षणं पुन्हा दिसून येत आहेत.
रुग्णालयात लांबच लांब रांगा :या रहस्यमयी आजाराबद्दल एका स्थानिक वृत्तवाहिनीनं सांगितलं की, या आजाराची कोणतीही नवीन लक्षणं नाहीत. परंतु, यात मुलांना सतत ताप येतोय आणि त्यांच्या फुफ्फुसांत गाठी तयार होत आहेत. यामुळं लहान मुलांच्या उपचारासाठी चीनच्या रुग्णालयांमध्ये लाबंच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतय. तसंच काही शिक्षकांना देखील या आजाराची लागण झाल्याची माहिती तेथी माध्यमांनी दिलीय. दवाखान्यासमोर रुग्णांना तब्बल 2 तासांपर्यंत रांगेत वाट पाहत राहावी लागत आहे. तर अनेक रुग्णालयात बेडही शिल्लक नाहीत.
हेही वाचा :
- Eye Infection : पूर्व विदर्भात डोळ्यांच्या संसर्गाने लोक हैराण; अशी घ्या डोळ्यांची काळजी
- Viral Fever : देशभरात वेगाने वाढत आहेत वायरल फीवरची प्रकरणे; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय....
- Pollution Effect on Children : रस्त्याच्या कडेला घर? आपल्या मुलाला होऊ शकतात गंभीर आजार...