तेल अवीव (इस्रायल) Israel War : पॅलेस्टाइनच्या हमास या संघटनेनं शनिवारी सकाळी इस्रायलवर जोरदार रॉकेट हल्ले केले. हमासनं सुमारे डझनभर रॉकेट इस्राइलवर डागले. इस्रायलच्या अश्कलोन आणि तेल अवीव या दोन प्रमुख शहरांवर हमासनं रॉकेटनं हल्ला केला. ही रॉकेट इस्रायलच्या निवासी भागात पडल्याचं वृत्त आहे. इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यानंतर भारतानं इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी दक्षतेचा इशार दिला आहे.
इस्रायलमध्ये आणिबाणी जारी : टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, हमासच्या रॉकेट हल्ल्यात किमान ५ लोक ठार झाले असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत. मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये शनिवारी सकाळी तब्बल साडेतीन तासांहून अधिक काळ रॉकेटचा मारा झाला. या हल्ल्यानंतर इस्रायलनेही गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल हल्ले सुरू केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशात आणिबाणी जाहीर केली आहे.
५००० हून अधिक रॉकेट डागली : शनिवारी गाझा पट्टीतून इस्रायलवर ५००० हून अधिक रॉकेट डागण्यात आली. हमासनं सांगितलं की, त्यांनी ऑपरेशन 'अल-अक्सा फ्लड' सुरू केलं आहे. 'आम्ही इस्रायलच्या सर्व गुन्ह्यांचा अंत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची बेजबाबदारपणे हल्ले करण्याची वेळ आता संपली, असं हमासनं म्हटलंय. आम्ही ऑपरेशन 'अल-अक्सा फ्लड'ची घोषणा केली. आम्ही २० मिनिटांच्या पहिल्या स्ट्राइकमध्ये ५००० हून अधिक रॉकेटचा मारा केला, असं ते म्हणाले. इस्रायलवरील हमासचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जातोय.
इस्रायलनं निवेदन जारी केलं : गाझा येथून रॉकेट हल्ले झाल्यानंतर इस्रायलनं निवेदन जारी केलं. युद्धासाठी आम्ही तयार असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. इस्रायलच्या संरक्षण दलानं एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये लिहिलंय की, गाझा पट्टीतून आमच्यावर क्षेपणास्त्र डागले जात आहेत. मात्र आम्ही आमचं संरक्षण करण्यास सक्षम आहोत.
हेही वाचा :
- Suicide Blast in Pakistan: पाकिस्तान आत्मघातकी बॉम्बस्फोटानं हादरलं, किमान ५२ जण ठार तर ५० हून अधिक जखमी
- Maldives Elections : मालदीवमध्ये चीन समर्थक मुइज्जू बनू शकतात नवे राष्ट्रपती, भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल?
- S Jaishankar : 'लोकशाहीबाबत इतर कोणाकडून शिकण्याची गरज नाही', परराष्ट्रमंत्री एस जयशंकर अमेरिकेत 'गरजले'