महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Indian Origin Shakuntla L Bhaya : भारतीय वंशाच्या नागरिकाचा अमेरिकेत डंका; राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केली महत्वाच्या पोस्टवर नियुक्ती - Indian Origin Shakuntla L Bhaya

Indian Origin Shakuntla L Bhaya : भारतीय वंशाच्या नागरिकाची अमेरिकेत महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शकुंतला एल भाया असं अमेरिकेत महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकाचं नाव आहे.

Indian Origin Shakuntla L Bhaya
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 16, 2023, 2:46 PM IST

सॅन फ्रान्सिस्को Indian Origin Shakuntla L Bhaya : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाची महत्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे. शकुंतला एल भाया असं त्या भारतीय वंशाच्या नागरिकाचं नाव आहे. शकुंतला एल भाया यांची अमेरिकेच्या प्रशासकीय परिषदेचे सदस्य म्हणून व्हाईट हाऊसनं नियुक्ती केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी याबाबतची नियुक्ती जाहीर केली आहे.

गव्हर्नर कार्ने यांच्या न्यायिक नामनिर्देशन आयोगाचे सदस्य :शकुंतला एल भाया हे डेलावेअर लॉ फर्मचे सहमालक म्हणून अमेरिकेत कार्यरत आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती केली आहे. भाया हे गेल्या सात वर्षांपासून गव्हर्नर कार्ने यांच्या न्यायिक नामनिर्देशन आयोगाचे सदस्य आहेत. कायद्याचा सराव करण्यासोबतच भाया डेलावेअरच्या राजकारणातही सामील आहेत, असं व्हाईट हाऊसनं सांगितलं.

डेलावेअर डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य :शकुंतला एल भाया हे अमेरिकेतील राजकारणात सक्रिय आहेत. डेलावेअर डेमोक्रॅटिक पक्षाच्या राज्य कार्यकारी समितीचे ते सदस्य आहेत. डेलावेअर ट्रायल लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे. शकुंतला एल भाया हे अमेरिकन असोसिएशन फॉर जस्टिस आणि अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनचे सदस्य देखील आहेत. लोकशाही समर्थक महिलांना पदावर निवडून येण्यास मदत करण्यात सक्रियपणानं ते मदत करतात.

नागरिकांच्या हक्कासाठी लढणारे राजकारणी :शकुंतला एल भाया हे एलजीबीटीक्यू समूदायाच्या हक्कासाठी लढणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यासह सदस्यांनी मुलं दत्तक घेण्यात कामाच्या ठिकाणी भेदभावाचा सामना करताना कायदेशीर मदत करण्यासाठी ते मदत करतात. शकुंतला एल भाया यांनी नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून पदवी घेतली आहे. डेलावेअर बार असोसिएशनमध्ये काम करणारे शकुंतला एल भाया हे पहिले दक्षिण आशियाई भारतीय असल्याची माहितीही यावेळी सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Ashok Gadgil Get National Medal : आयआयटी मुंबईत शिक्षण घेतलेल्या वैज्ञानिक अशोक गाडगीळ यांचा जो बायडेन यांच्याकडून सन्मान, वाचा सविस्तर
  2. Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकेची उडी, राष्ट्रध्यक्ष जो बायडन इस्रायलला जाणार

ABOUT THE AUTHOR

...view details