न्यूयॉर्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांच्यासह विविध क्षेत्रातील प्रमुख अमेरिकन व्यक्तींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींनी भारताविषयी एक विश्वास दर्शवला आहे. इतर मोठ्या देशांपेक्षा भारताकडे अधिक आश्वासने आहेत. भारत भविष्याबद्दल उत्साहित असल्याची प्रतिक्रिया या व्यक्तींनी दिली.
मान्यवरांनी घेतली भेट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांची भेट अनेक मान्यवरांनी घेत आहेत. यात नोबेल पारितोषिक विजेते, अर्थतज्ज्ञ, कलाकार, वैज्ञानिक, अभ्यासकांसह विविध क्षेत्रातील दोन डझनहून अधिक विचारवंतांची भेट घेत आहेत. , उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ञ आहेत. दरम्यान उद्योजकांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली.
मी मोदींचा चाहता : मंगळवारी एलन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सौरऊर्जा गुंतवणुकीसाठी भारत उत्तम आहे. आपली आणि पंतप्रधान मोदींसोबतची चर्चा ही सकारात्मक राहिली असल्याची प्रतिक्रिया मस्क यांनी पत्रकारांना दिली. भारत भविष्याविषयी उत्साहित असल्याचेही मस्क यावेळी म्हणाले. एका व्हिडिओमध्ये बोलताना मस्क यांनी मोदींचे कौतुक केले. "त्यांना खरोखर भारताची काळजी आहे कारण ते भारतात महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यासाठी आमचा पाठपुरावा करत आहेत." मी मोदींचा चाहता आहे, असेही मस्क म्हणाले.
डर्सीला मस्कचे उत्तर : ट्विटरचे माजी मालक आणि सीईओ जॅक डोर्सी यांनी भारतात सोशल मीडियाची आणि लोकशाहीची गळचेपी केली जात असल्याचा आरोप केला होता. ट्विटर आणि सोशल मीडियाला स्थानिक सरकारचे अनुसरण करण्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर ते बंद होतील, असे डर्सी होणाले होते. त्याविषयी एलन मस्क यांना पत्रकारांनी विचारणा केली होती. त्यावर बोलताना मस्क म्हणाले की, भारत भविष्याविषयी उत्साहित आहे. आपण सर्वोत्तमपणे कोणत्याही देशाच्या कायद्याचे कसे पालन करू याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यापेक्षा जास्त करणे आपल्यासाठी अशक्य आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारांसाठी वेगवेगळे नियम आणि कायदे आहेत. आपण कायद्यामध्ये राहत बोलण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करावे.
टेस्ला भारतात लवकर येणार : एलन मस्क यांची महत्त्वकांक्षी टेस्लाविषयीही पत्रकारांनी प्रश्न केला. टेस्ला भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार का असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी मस्क यांना विचारला. त्यावर उत्तर देताना मस्क म्हणाले की, पुढील वर्षी भारताचा दौरा करणार आहे. मला विश्वास आहे की, टेस्ला भारतात असेल आणि शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करेल. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मस्क म्हणाले की, मी पंतप्रधानांना त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद देतो. त्याचबरोबर आशा आहे की, भविष्यात काहीतरी जाहीर घोषणा केली जाईल. आम्हाला तोफ डागल्याप्रमाणे घोषणेवर जायचे नाही. पण मला वाटते की भारतासोबतच्या आमच्या संबंधांमध्ये ही एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक असेल, असे टेस्लाचे सीईओ म्हणाले.
हेही वाचा -
- PM Modi US Visit : भारत-अमेरिकेतील 'हे' पाच मोठे संरक्षण करार चीन, पाकिस्तानची झोप उडवतील! जाणून घ्या
- PM Modi: चीनसोबत सामान्य द्विपक्षीय संबंधांसाठी सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य आवश्यक- पंतप्रधान मोदी