महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

OceanGate Titan submersible : समुद्रात बुडालेल्या टायटन सबमर्सिबलच्या मलब्यात सापडले मानवी अवशेष,अपघाताचे गुढ कळणार - ओशनगेट कंपनीची टायटन पाणबुडी

उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाज पाहण्यासाठी गेलेल्या ओशनगेट कंपनीच्या सबमर्सिबलचा मलबा समुद्राच्या बाहेर आणण्यात आला आहे. पाणबुडीच्या या ढिगाऱ्यात मानवी अवशेष सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

टायटन पाणबुडीचा मलबा
टायटन पाणबुडीचा मलबा

By

Published : Jun 29, 2023, 9:33 AM IST

Updated : Jun 29, 2023, 4:02 PM IST

पोर्टलँड : अटलांटिक महासागरात 111 वर्षापूर्वी बुडालेल्या महाकाय टायटॅनिक जहाजाला पाहण्यासाठी गेलेल्या सर्व साहसी प्रवाशांचा समुद्रात मृत्यू झाला. ओशनगेट नावाच्या सबमर्सिबलद्वारे हे प्रवाशी समुद्रात प्रवास करत होते. दरम्यान समुद्रात या सबमर्सिबलचा स्फोट झाला आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या ओशनगेट सबमर्सिबलच्या ढिगाऱ्या खाली मानवी अवशेष सापडले असल्याची माहिती युएस कोस्ट गार्डने दिली आहे.

मानवी अवशेष : उत्तर अटलांटिक महासागराच्या पृष्ठभागापासून 12 हजार फूटपेक्षा जास्त खोल समुद्राच्या तळावरुन टायटनचा ढिगारा गोळा करण्यात आला आहे. समुद्रात स्फोटात नष्ट झालेल्या पाणबुडीचा मलबा सेंट जॉन्स, न्यूफाउंडलँड येथे आणण्यात आला. मलबा न्यूफाउंडलँड येथे आणल्यानंतर त्यात मानवी अवशेष सापडल्याची घोषणा करण्यात आली. न्यूफाउंडलँड येथील कॅनेडियन कोस्ट गार्ड बंदरावर सबमर्सिबलचे वळलेले तुकडे उतरवण्यात आले आहेत. दरम्यान पाणबुडीच्या ढिगाऱ्यात सापडलेल्या मानवी अवशेष कोणाचे आहेत, याचा तपासही आता केला जाणार आहे.

टायटन सबमर्सिबलच्या अपघाताचे गुढ कळणार

टायटन पाणबुडीचा मलबा : दरम्यान गेल्या आठवड्यात 18 जून रोजी ओशनगेट कंपनीची टायटन पाणबुडी टायटॅनिक पर्यटनासाठी समुद्रात गेली होती. मात्र पहिल्याच दिवसापासून या पाणबुडीचा संपर्क तुटला होता. त्यानंतर या पाणबुडीचा शोध घेतला गेला. खूप शोध घेतल्यानंतर या ओशनगेट पाणबुडीचा स्फोट झाल्या सांगण्यात आले. या पाणबुडीत असलेल्या सर्व 5 लोकांचा मृत्यू झाल्याचेही घोषित करण्यात आले होते. हा स्फोट कोणत्या कारणामुळे झाला हे जाणून घेणे. तसेच तळावरून मलबा उचलून आणणे हा महत्त्वाचा टास्क आहे. समुद्रात 22 फूट खोल जाऊन मलबा आणण्याच्या घटनेने जगाचे लक्ष वेधले आहे.

या टायटन पाणबुडीच्या दुर्घटनेसाठी कारणभीत असलेल्या घटकांना समजून घेणे. तसेच अशा घटना परत पुन्हा घडून नये. यासाठी दुर्घटनेची सर्व कारणे समजून घेणे गरजेचे आहे. त्याबाबत करण्यात येणारे शोध अजून खूप बाकी आहे. युएसमधील बंदरात आणण्यात आलेल्या पाणबुडीच्या ढिगाऱ्यांच्या तुकड्यासह पुराव्याचे विश्लेषण आणि चाचणीने विस्फोटाचे गंभीर कारण लक्षात येईल- तटरक्षक दलाचे प्रमुख कॅप्टन जेसन न्यूबाउर .

विस्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न : टायटन पाणबुडीचा 18 जून रोजीच विस्फोट झाला असल्याचा अंदाज आहे. समुद्रात 12 हजार 500 फूट खोल या पाणबुडीचे अवशेष आढळले आहेत. समुद्राच्या पृष्ठाभागासपासून याचे अंतर मोजले तर ते तब्बल 1 हजार 600 फूट (488 मीटर )अंतरावर आहे. अजूनही मिशन चालू आहे, त्यामुळे तपासावर भाष्य करू शकत नाही. असे पेलाजिक रिसर्च सर्व्हिसेस, आणि जी आरओव्हीची कंपनीचे प्रवक्ते जेफ महोनी यांनी सांगितले. ते गेल्या 10 दिवसांपासून कारणांचे शोध घेत असल्याचे महोनी म्हणाले.

गोळा करण्यात आलेल्या ढिगाऱ्यांच्या भौतिक सामग्रीचे विश्लेषण केल्याने टायटनचे काय झाले याबद्दल महत्त्वाचे संकेत मिळू शकतात. याविषयीची माहिती सबमर्सिबलच्या उपकरणांद्वारे रेकॉर्ड करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक डेटामध्ये मिळूु शकते, असे सांगण्यात येत आहे. परंतु " प्रश्न असा आहे की, कोणताही डेटा उपलब्ध आहे का? आणि मला त्या प्रश्नाचे उत्तर खरोखरच माहित नाही," -प्रवक्ते जेफ महोनी

हेही वाचा -

  1. Very similar tragedy:टायटॅनिकचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनची टायटन सबमर्सिबल शोकांतिकेवर प्रतिक्रिया
  2. Titan Submersible : टायटॅनिक जहाजाचा मलबा पाहण्यासाठी गेले अन् पाणबुडीमधील सर्व कोट्यधीश प्रवाशांचा मृत्यू
Last Updated : Jun 29, 2023, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details