महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Hamas Israel war : इस्रायल हमास युद्धाचा 16 दिवस; गाझावर पुन्हा हल्ला करण्याची इस्रायलनं आखली योजना - इस्रायल आणि हमास युद्ध

Hamas Israel war : इस्रायल आणि हमास युद्धाचा आजचा 16 वा दिवस आहे. इस्रायलनं हमासवर आणखी तीव्र हल्ले करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे आगामी काळात हमासमध्ये नागरिकांचे आणखी बळी जाण्याची शक्यता आहे.

Hamas Israel war
संग्रहित छायाचित्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 1:06 PM IST

जेरुसलेम Hamas Israel war : हल्ला करणाऱ्या हमासला इस्रायलनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. हमास आणि इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात आतापर्यंत हजारो नागरिकांचा बळी गेला आहे. गाझा पट्टीत इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत नागरिकांचा बळी गेल्यानं जगभरातून हे युद्ध थांबवण्यात यावं, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हमासनं दोन अमेरिकन नागरिकांची सुटका केली आहे. मात्र या युद्धात झालेल्या जीवितहानीमुळे जगभरातून गाझा पट्टीत मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

हमास आणि इस्रायल युद्धात साडेचार हजार नागरिकांचा बळी :हमासवरील युद्धाच्या पुढील टप्प्याची तयारी इस्रायलनं सुरू केली आहे. त्यामुळेच शनिवारपासून हल्ले वाढवण्याची योजना इस्रायलनं आखल्याचं इस्रायलच्या सैन्य दलातील प्रवक्त्यानं स्पष्ट केलं आहे. हमास आणि इस्रायलमधील सुरू असेललं हे युद्ध सर्वात प्राणघातक आहे. मृतांची संख्या 4 हजार 385 वर पोहोचली आहे. या युद्धात 13 हजार 561 नागरिक जखमी झाल्याची माहिती हमासच्या गाझा आरोग्य मंत्रालयानं शनिवारी दिली आहे.

इस्रायलचे दीड हजार नागरिक बळी, लाखो ओलीस :इस्रायलमध्ये 1 हजार 400 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. 7 ऑक्टोबरला हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याची ही आकडेवारी आहे. हमासनं 203 नागरिकांना पकडलं आहे. या नागरिकांना हमासनं गाझामध्ये नेलं असून त्यांना ओलीस ठेवल्याचं इस्रायली सैन्य दलानं नमूद केलं आहे.

इटलीच्या पंतप्रधान इस्रायल भेटीवर :इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेण्यासाठी इस्रायलला गेल्याची माहिती त्यांच्या कार्यालयानं दिली आहे. इस्त्रायल-हमास युद्धाला थांबवण्यासाठी कैरोमधील शिखर परिषदेत चर्चा झाली. त्यानंतर मेलोनी बैठकीनंतर इस्रायलला गेल्या आहेत. गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार बचाव करुन शांततेत जगण्याच्या इस्रायलच्या अधिकाराचा त्यांनी पुनरुच्चार केला. 7 ऑक्टोबरला हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इस्रायल आणि इटलीच्या मैत्रिचा संदेश देत इस्रायलला पाठिंबा दिला होता.

हेही वाचा :

  1. Hamas released Two US hostages : 'हमास'नं केली दोन अमेरिकन ओलिसांची सुटका; आयडीएफनं केली पुष्टी
  2. Israel Hamas War : युद्धाचा आठवा दिवस; गाझाच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या आवारात जमले हजारो लोकं

ABOUT THE AUTHOR

...view details