वॉशिंग्टन डी. सी -कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगभरामध्ये युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. जगभरामध्ये आतापर्यंत 93 लाख 45 हजार 569 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
जगभरात 93 लाख 45 हजार 569 जण कोरोनाग्रस्त अद्ययावत आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात 93 लाख 45 हजार 569 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 4 लाख 78 हजार 949 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 50 लाख 36 हजार 723 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत 154 जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 43 हजार 81 वर पोहचला आहे.
कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत. तर आधीपासून आजारांनी त्रस्त असलेले आणि वयोवृद्ध नागरिकांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका आहे. अशा रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे आढळून येण्याची शक्यता जास्त आहे. सर्वात जास्त मृत्यू अशा रुग्णांचेच नोंदविले गेले आहेत.
कोरोना विषाणुची सुरुवात मध्य चीनमधील वुहान प्रांतातून झाली होती. त्यानंतर हा विषाणू झपाट्यानं जगभरात पसरत होता. चीनमध्ये हा विषाणू आटोक्यात आला. मात्र, जगभरात त्यानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यामुळे जागतिक व्यापार, उद्योग, पर्यटन, वाहतूक सर्व खोळंबली असून जगावर आरोग्य आणीबाणी आली आहे. अनेक देशांना वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा भासत आहे, त्यातच रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे.