टोकियो ( जपान ) : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात ( Shinzo Abe has been shot ) आल्या. शिंजो आबे यांच्या छातीत गोळी लागली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने सध्या आबे यांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यांन त्यांचा मृत्यू झाला. पोलीस यंत्रणेने संशयित हल्लेखोराला अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे.
जपानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख करण्यात आली आहे. त्याचे वय ४१ आहे. गोळीबाराचे कारण समजू शकले नाही. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर हल्ला हा नारा शहरात झाला. घटनेच्या वेळी ते भाषण करत होते. गोळी लागल्यावर आबे खाली पडले. त्यांच्या शरीरातूनही रक्त येत होते. शिंजो आबे अचानक पडल्यामुळे तिथे उपस्थित लोकांना काहीच समजले नाही. मात्र, यादरम्यान काही लोकांनी तेथे गोळीबार केल्यासारखे काहीसे आवाज ऐकू आले. सध्या एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.