जकार्ता - इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या 5.6 तीव्रतेच्या भूकंपात आत्तापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला असून किमान 700 लोक जखमी झाले आहेत. (Earthquake in Java of Indonesia). जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एएफपीने स्थानिक अधिकार्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावामधील सियांजूर येथे आहे. (Indonesia Earthquake).
Indonesia Earthquake : इंडोनेशियाच्या जावा बेटावर भूकंपाचे हादरे, आत्तापर्यंत 46 लोकांचा मृत्यू
इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपात (Earthquake in Java of Indonesia) आत्तापर्यंत 46 लोकांचा मृत्यू झाला असून किमान 700 लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Indonesia Earthquake).
भूकंपात सुमारे 20 लोकांचा मृत्यू
इंडोनेशियाची राजधानी जकार्तापासून सुमारे 75 किमी आग्नेय दिशेला असलेल्या सियानजूरमध्ये सोमवारी 10 किमी (6.2 मैल) खोलीवर हा भूकंपाचा धक्का बसला. हवामान आणि भूभौतिकी संस्थेने सांगितले आहे की, त्सुनामीची कोणतीही शक्यता नाही. इंडोनेशिया हा तथाकथित "पॅसिफिक रिंग ऑफ फायर" असून हे भूकंपीयदृष्ट्या अत्यंत सक्रिय क्षेत्र आहे. येथे पृथ्वीच्या कवचावरील विविध प्लेट्स एकत्र येतात आणि मोठ्या प्रमाणात भूकंप आणि ज्वालामुखी तयार करतात.
Last Updated : Nov 21, 2022, 5:24 PM IST