हांगझोऊ Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये भारतीय महिला खेळाडू जोरदार प्रदर्शन करत आहेत. भारतीय महिला खेळाडू सिफ्ट समरा, आशी चौकसे यांनी मोठं यश मिळवलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सिफ्ट समरानं 50 मीटर रायफल 3P नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलंय. समरानं 469.6 गुण मिळवत ही कामगिरी केली, जो एक नवा विश्वविक्रम आहे.
समरानं सुवर्णपदक जिंकलं :या सामन्यात आशी चौकसेला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. समरानं 469.6 विक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकलं. शेवटच्या शॉटपूर्वी आशी चौकसे दुसऱ्या स्थानावर होती. आठ महिलांच्या अंतिम फेरीत तिसऱ्या स्थानावर राहण्यासाठी तिला 451.9 शॉटसह कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. चीनच्या किओनग्यु झांगनं 462.3 गुणांसह भारताचा 1-2 असा पराभव करत रौप्यपदक जिंकलं. अंतिम फेरीत विजय मिळवण्यापूर्वी, समरानं पात्रता स्पर्धेत 600 पैकी 594 गुणांसह आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडला. चीनच्या झिया सियूनं 10 गुणांनी अव्वल स्थान पटकावलं.
50 मीटर रायफलमध्ये सांघिक रौप्य पदक :आशी चौकसे एकूण ५९० गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, मानिनी कौशिक 580 गुणांसह 18व्या स्थानावर राहिली. आज सकाळी सिफ्ट समरा, आशी चौकसे, मानिनी कौशिक या त्रिकुटानं रौप्य पदकानं दिवसाची सुरुवात केली. सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे मानिनी कौशिक यांनी ५० मीटर रायफलमध्ये सांघिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं.
आतापर्यंत एकूण 5 सुवर्णपदकांची कमाई : या सुवर्ण पदकासह भारताच्या खात्यात एकूण 5 सुवर्णपदकं पडली आहेत. भारतानं 10 मीटर नेमबाजी स्पर्धेत पहिलं सुवर्ण जिंकलं, त्यानंतर महिला क्रिकेट स्पर्धेत भारतानं दुसरं सुवर्ण जिंकलं. मंगळवारी घोडेस्वारी स्पर्धेत भारतानं तिसरं सुवर्ण पदक जिंकलं. आज भारतानं दोन सुवर्णपदके जिंकली आहेत. आजचं पहिलं, चौथं सुवर्णपदक भारतानं 25 मीटर पिस्तुल प्रकारात जिंकलं आहे. पाचवं सुवर्णपदक आज 50 मीटर रायफल 3P नेमबाजीत जिंकलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण 5 सुवर्णपदके आली आहेत.
हेही वाचा -
- Ind Vs Aus Match : ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, मिचेल मार्शचं शतक हुकलं, 96 धावा करून बाद
- Asian Games २०२३ : 'गोल्डन बॉय' निरज चोप्रा या वर्षीही करणार 'सुवर्ण' कामगिरी, काकानं व्यक्त केला आशावाद
- Ind Vs Aus Match : नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाची फलंदाजी