इस्लामाबाद Pakistan Attack On Iran: पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. मात्र, हा हल्ला कुठे, किती आणि कोणाच्या निशाण्यावर करण्यात आला, हे पाकिस्तानकडून अद्याप सांगण्यात आलेलं नाही.
इराणचेही पाकिस्तानवर हल्ले: 5 वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारतानंतर इराणनेही पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्ताननेही इराणमधील बलुच दहशतवादी गटांवर हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिल्याची माहिती मिळतेय. यापूर्वी इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. पाकिस्तानातील राजकीय लोक आणि सर्वसामान्य जनता याविरोधात सोशल मीडियावर सातत्याने निषेध करत आहे. आता पाकिस्तानातून इराणमध्ये हवाई हल्ल्याची बातमी आलीय.
पाकिस्तानने केले आरोप: या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेलं नाही. हा हल्ला कुठे, कोणावर आणि केव्हा करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. इराण दहशतवादी संघटनांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने यापूर्वी केला होता. तर इराणनेही पाकिस्तानवर असेच आरोप केले होते.