महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

World Hindi Conference : 12वी जागतिक हिंदी परिषद, जयशंकर यांनी फिजीच्या राष्ट्रपतींसोबत जारी केले टपाल तिकीट - फिजीमध्ये जागतिक हिंदी परिषद

12 व्या जागतिक हिंदी संमेलनाचे आयोजन फिजी येथे करण्यात आले आहे. जगभरातील हिंदीप्रेमी यामध्ये सहभागी होत आहेत. यावेळी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी फिजीच्या राष्ट्रपतींसोबत टपाल तिकीट जारी केले.

S Jaishankar
एस. जयशंकर

By

Published : Feb 15, 2023, 9:10 AM IST

सुवा (फिजी) : फिजी येथे 12 व्या जागतिक हिंदी परिषदेत परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी फिजीचे राष्ट्रपती रातू विल्यम मावाली काटोनिवेरे यांच्यासह टपाल तिकीट आणि 6 पुस्तकांचे प्रकाशन केले. हा प्लॅटफॉर्म फिजीच्या भारतासोबतच्या ऐतिहासिक आणि विशेष नातेसंबंधांना आणखी दृढ करण्याची संधी देतो. फिजीवासीयांना बॉलीवूड चित्रपटाचे वेड असून ते हिंदी सिनेमाचे मोठे चाहते आहेत!

सर्व समाजांची माहिती असणे आवश्यक : नाडी, फिजी येथे आयोजीत 12 व्या जागतिक हिंदी परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले, 'ज्या काळात आपण प्रगती आणि आधुनिकतेची तुलना पाश्चात्यीकरणाशी करू लागलो त्या वसाहती काळात दडपल्या गेलेल्या अशा अनेक भाषा आणि परंपरा पुन्हा जागतिक पटलावर आवाज उठवत आहेत. अशा परिस्थितीत जगाला सर्व संस्कृती आणि समाजांची माहिती असणे आवश्यक आहे'.

फिजीमधील हिंदीच्या स्थितीवर चर्चा : जयशंकर म्हणाले, '12व्या जागतिक हिंदी संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित राहून खूप आनंद होत आहे. या संदर्भात आमचे सहकारी भागीदार असल्याबद्दल मी फिजी सरकारचे आभार मानतो. आपल्यापैकी अनेकांसाठी फिजीला भेट देण्याची आणि आपल्या दीर्घकालीन संबंधांना प्रोत्साहन देण्याची ही एक संधी आहे. जागतिक हिंदी संमेलनासारख्या कार्यक्रमात आपले लक्ष हिंदी भाषेच्या विविध पैलूंकडे, तिचा जागतिक वापर आणि प्रसाराकडे जाणे स्वाभाविक आहे. फिजीमधील हिंदीची स्थिती, पॅसिफिक प्रदेश आणि कंत्राटी देश या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करू'.

भारत-फिजीचे संबंध दृढ होतील :गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी म्हणाले, 'हिंदी भाषेचा प्रचार आणि भारताच्या संस्कृतीबद्दल जगाचे ज्ञान वाढवणे हा या परिषदेचा उद्देश आहे. आज जेव्हा कोणताही देश किंवा समुदाय संकटात सापडतो तेव्हा भारत सरकार त्याला साथ देते. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले, 'ही परिषद येथे आयोजित करण्यास सहमती दिल्याबद्दल मी फिजी सरकारचे आभार मानू इच्छितो. मला खात्री आहे की यामुळे भारत आणि फिजी यांच्यातील दीर्घकालीन ऐतिहासिक आणि सखोल संबंध दृढ होण्यास मदत होईल. या 12व्या जागतिक हिंदी परिषदेची थीम 'हिंदी पारंपारिक ज्ञानापासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेकडे' अशी आहे. खगोलशास्त्रापासून ते अभियांत्रिकीपर्यंत आणि औषधापासून गणितापर्यंत, जगात आपल्या पूर्वजांच्या योगदानाचा गौरव केल्या जातो'.

हेही वाचा :Complaint against Akshay Kumar : भारताच्या नकाशाचा अवमान केल्याप्रकरणी अक्षय कुमारविरोधात गृहमंत्रालयात तक्रार

ABOUT THE AUTHOR

...view details