बगदाद -इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुदस फोर्सचा म्होरक्या कासीम सुलेमानी ठार झाला. त्याच्यासह आणखी ६ जणही ठार झाले. अल जझीरा या वृत्तसंस्थेने याविषयीचे वृत्त दिले आहे.
सुलेमानीशिवाय इराकी बिगरलष्करी सेनेचा कमांडर अबु महदी अल-मुहान्दीस हाही या हल्ल्यात ठार झाला. इराकमधील पॉप्युलर मॉबिलायझेशन फोर्स (PMF - जमवाजमव करून तयार केलेले बिगरलष्करी सशस्त्र गट) प्रसिद्ध आहेत. हे सर्व गट इराणच्या बिगरलष्करी सशस्त्र पाठिंब्याने तयार झाले आहेत. त्यांनीही सुलेमानी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.