महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 29, 2020, 6:45 PM IST

ETV Bharat / international

तुर्कीमध्ये 24 तासांतील सर्वाधिक कोविड-19 रुग्णांची नोंद

कोविड - 19 च्या रुग्णांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण 3.4 टक्के आहे आणि गंभीर आजारी रुग्णांची संख्या 4 हजार 903 आहे. कोरोनाविषाणू बाधितांच्या संख्येमध्ये वेगाने होणारी वाढ टाळण्यासाठी तुर्कीने अनेक प्रतिबंध पुन्हा लागू केले आहेत. यामध्ये आठवड्याच्या शेवटी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत अंशत: संचारबंदीसह अनेक निर्बंधांचा समावेश आहे.

तुर्की कोविड-19 न्यूज
तुर्की कोविड-19 न्यूज

अंकारा - तुर्कीमध्ये एका दिवसात कोविड - 19 च्या 30 हजार 103 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच, एका दिवसात इतकी प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

'शनिवारपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 5 लाख 78 हजार 347 वर गेली आहे. तसेच, 182 मृत्यूंसह मृत्यू झालेल्या लोकांची संख्या वाढून 13 हजार 373 झाली आहे. एकूण 3 लाख 96 हजार 227 रुग्ण बरे झाले आहेत,' असे आरोग्य मंत्रालयाने सांगितल्याचे सिन्हुआच्या वृत्तात म्हटले आहे.

हेही वाचा -वुहानमधील तपास अधिकाऱ्यांना गोठवलेल्या अन्नावर आढळला कोविड-19चा विषाणू

कोविड - 19 च्या रुग्णांमध्ये न्यूमोनियाचे प्रमाण 3.4 टक्के आहे आणि गंभीर आजारी रुग्णांची संख्या 4 हजार 903 आहे. कोरोनाविषाणू बाधितांच्या संख्येमध्ये वेगाने होणारी वाढ टाळण्यासाठी तुर्कीने अनेक प्रतिबंध पुन्हा लागू केले आहेत. यामध्ये आठवड्याच्या शेवटी सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत अंशत: संचारबंदीसह अनेक निर्बंधांचा समावेश आहे.

याशिवाय, या वर्षाअखेरीपर्यंत शाळा बंद राहतील आणि केवळ ऑनलाईन शिक्षणच दिले जाईल, असे तुर्कीने जाहीर केले आहे.

हेही वाचा -ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी

ABOUT THE AUTHOR

...view details