महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

सौदी अरेबियाने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी उठवली!

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विकसीत स्ट्रेनमुळे जगभरातील विविध देशांनी पुन्हा आपल्या सीमा बंद करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियानेही आपल्या सीमा बंद करत हवाई, जलमार्ग वा रस्तेमार्ग या कोणत्याही प्रकारे विदेशी नागरिकांना देशामध्ये येण्यास मज्जाव केला होता. दोन आठवड्यांनंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे.

Saudi Arabia lifts ban on int'l flights, land & sea entry
सौदी अरेबियाने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी उठवली!

By

Published : Jan 3, 2021, 8:19 PM IST

रियाध :सौदी अरेबियाने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी उठवली आहे. यामध्ये विमान प्रवास, जहाजे आणि जमीनमार्गे प्रवासाचा समावेश आहे. सौदी वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विकसीत स्ट्रेनमुळे जगभरातील विविध देशांनी पुन्हा आपल्या सीमा बंद करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियानेही आपल्या सीमा बंद करत हवाई, जलमार्ग वा रस्तेमार्ग या कोणत्याही प्रकारे विदेशी नागरिकांना देशामध्ये येण्यास मज्जाव केला होता. दोन आठवड्यांनंतर आता ही बंदी उठवण्यात आली आहे. रविवारी सकाळी ११ पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे देशाच्या गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

तरीही विविध नियम लागू..

प्रवासावरील बंदी हटवण्यात आली असली, तरीही विदेशी नागरिकांना सौदीमध्ये येण्यासाठी अगोदर अशा देशांमध्ये किमान १४ दिवस रहावे लागणार आहे ज्याठिकाणी अद्याप नव्या कोरोना स्ट्रेनचा प्रसार झाला नाही. तसेच, देशात येण्यासाठी किमान एक कोरोना चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. यासोबतच, बाहेरच्या देशात असणाऱ्या सौदीच्या नागरिकांना परत मायदेशी यायचे असल्यास १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. तसेच, त्यांच्या दोन कोरोना चाचण्याही कराव्या लागणार आहेत.

सौदी अरेबियामध्ये गेल्या फेब्रुवारीत पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर देशात वेगाने कोरोनाचा प्रसार झाला. सौदी सरकारने वर्षभर विविध प्रयत्न केल्यामुळे अखेर आता दररोजची कोरोना रुग्णांची संख्या दोनशेच्या घरात आली आहे.

हेही वाचा :ब्रिटनमध्ये कोविड रुग्णसंख्येत 24 तासांत नोंदवली सर्वाधिक वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details