महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

सौदी अरेबियात काम करणाऱ्या भारतीय नर्सला कोरोना व्हायरसची लागण - coronavirus News

सौदी अरेबियामध्ये काम करणाऱ्या एका भारतीय परिचारिकेला (नर्स) कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. येथील जवळजवळ १०० भारतीय नर्सची चाचणी घेण्यात आली.

कोरोना व्हायरस
कोरोना व्हायरस

By

Published : Jan 24, 2020, 4:32 AM IST

Updated : Jan 24, 2020, 3:24 PM IST

नवी दिल्ली - सौदी अरेबियामध्ये काम करणाऱ्या एका भारतीय परिचारिकेला (नर्स) कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. येथील जवळजवळ १०० भारतीय नर्सची चाचणी घेण्यात आली. त्यातील फक्त एकच नर्स व्हायरसने संक्रमित झालेली आढळून आली.

हेही वाचा -चीनमध्ये कोरोना व्हायरसचा धोका; 830 संक्रमित रुग्णांमधील २५ जणांचा मृत्यू

चाचणी घेण्यात आलेल्यांपैकी अनेक नर्स केरळ राज्यातील आहेत. व्हायरसने संक्रमित झालेल्या नर्सवर असीर नॅशनल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती सुधारत असल्याचे केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.

हेही वाचा -नरेंद्र मोदी घेणार ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ २०२० च्या विजेत्या मुलांची भेट

सौदी अरेबियातील जेद्दा येथील भारतीय काऊन्सलेटबरोबर याविषयी चर्चा केल्याची माहिती मुरलीधरन यांनी दिली. अल हयात रुग्णालय, खामिस मुशाहित येथे भारतीय नर्सेसला वेगळे ठेवण्यात आले होते, अशीही माहिती त्यांनी दिली. भारतीय काऊन्सलेट रुग्णालय प्रशासन आणि सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधला आहे. संक्रमण झालेल्या नर्सेसला चांगले उपचार देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना व्हायरसचा सर्वात जास्त प्रभाव चीनमध्ये झाला आहे. त्यामुळे चीनमधून राज्यात येणाऱ्या नागरिकांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती द्यावी, असे केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले. तसेच राज्यातील महत्त्वाच्या विमानतळांवरही चीनमधून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवले जाईल, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा -पर्यावरण रक्षणासाठी रायचूर शहरात नलिनी वाटतात मोफत कापडी पिशव्या

काय आहे कोरोना व्हायरस?

कोरोना विषाणूमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही.

Last Updated : Jan 24, 2020, 3:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details